खासगी शाळांमध्ये सीईटीद्वारे भरती

By Admin | Published: September 4, 2015 10:46 PM2015-09-04T22:46:29+5:302015-09-04T22:46:29+5:30

मुंबई- राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीकरिता केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी) घेण्याकरिता १० ऑक्टोबर २०१५ ते १५ जानेवारी २०१६ या चार महिन्यांची मुदत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिली आहे. यामुळे आता पुढील वर्षी १५ जानेवारीपर्यंत सीईटीद्वारे ही भरती होणार हे स्पष्ट झाले आहे.

CIT recruitment in private schools | खासगी शाळांमध्ये सीईटीद्वारे भरती

खासगी शाळांमध्ये सीईटीद्वारे भरती

googlenewsNext
ंबई- राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीकरिता केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी) घेण्याकरिता १० ऑक्टोबर २०१५ ते १५ जानेवारी २०१६ या चार महिन्यांची मुदत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिली आहे. यामुळे आता पुढील वर्षी १५ जानेवारीपर्यंत सीईटीद्वारे ही भरती होणार हे स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत जाहिरातीद्वारे ऑनलाईन अर्ज मागवणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती व निकाल जाहीर करणे ही कामे पूर्ण करायची आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा कृती आराखडा आखून दिलेला आहे. खासगी शाळांमधील भरती सीईटीद्वारे घेण्याकरिता सध्याच्या कायद्यात काही बदल करणे गरजेचे असून त्या प्रस्तावाला डिसेंबरमध्ये होणार्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी घेण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: CIT recruitment in private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.