टॉवरच्या कामाला नागरिकांचा विरोध
By admin | Published: July 9, 2015 10:47 PM2015-07-09T22:47:04+5:302015-07-10T00:23:28+5:30
इंदिरानगर : राजीवनगर येथील कानिफनाथ चौकातील विजयंता पार्क अपार्टमेंटमध्ये बसविण्यात येणार्या मोबाइल टॉवर्सचे काम नागरिकांना बंद पाडून दूरसंचार निगम आणि मनपाच्या नगररचना विभागास निवेदन देण्यात आले.
इंदिरानगर : राजीवनगर येथील कानिफनाथ चौकातील विजयंता पार्क अपार्टमेंटमध्ये बसविण्यात येणार्या मोबाइल टॉवर्सचे काम नागरिकांना बंद पाडून दूरसंचार निगम आणि मनपाच्या नगररचना विभागास निवेदन देण्यात आले.
कानिफनाथ चौक परिसरात विविध अपार्टमेंट आणि सोसायटी आहेत. त्यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक राहतात. येथील विजयंता पार्क अपार्टमेंटमधील आणि परिसरातील नागरिकांची कोणतीही परवानगी न घेता दुपारच्या सुमारास टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. सदर बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर कामास विरोध करून काम बंद पाडले.
मोबाइल टॉवरच्या लहरींमुळे शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवतात असा आरोप करीत परिसरातील नागरिकांनी एकत्र येत येथील कामाला विरोध केला. यावेळी संतप्त नागरिकांनी दूरसंचार विभागाचे आणि नगररचना विभागाच्या अधिकर्यांची भेट घेऊन या कामास विरोध दर्शविली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर कृष्णकांत पाटील, गिरीश दरेकर, किशोर सरोदे, योगेश दुसाने, अविनाश दरेकर, संतोष चोरडिया, डॉ. सचिन खांबेकर आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.