नागरिकांना मुलीच दत्तक हव्यात

By admin | Published: January 11, 2016 02:50 AM2016-01-11T02:50:03+5:302016-01-11T02:50:03+5:30

देशात स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण समपातळीवर आणण्यास सरकार धडपडत असताना दत्तक घेताना मुलांच्या तुलनेत मुलींची मागणी वाढत आहे.

Citizens should adopt daughters | नागरिकांना मुलीच दत्तक हव्यात

नागरिकांना मुलीच दत्तक हव्यात

Next

नवी दिल्ली : देशात स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण समपातळीवर आणण्यास सरकार धडपडत असताना दत्तक घेताना मुलांच्या तुलनेत मुलींची मागणी वाढत आहे. आम्हाला दत्तक म्हणून मुलीच हव्यात, असा आग्रह अपत्यांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडून होत आहे. गत तीन वर्षांत ५१६७ मुलांच्या तुलनेत ७४३९ मुलींना दत्तक घेतले गेले.
महिला व बालकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून हे सकारात्मक तथ्य समोर आले आहे. २०१२-१३ मध्ये देशभरात २८४६ मुलींना, तर १८४८ मुलांना दत्तक घेतले गेले. २०१३-१४ मध्ये २२९३ मुली आणि १६३१ मुलींना दत्तक घेतले गेले. २०१४-१५ मध्ये हा आकडा अनुक्रमे २३०० आणि १६८८ एवढा राहिला. सेंट्रल अ‍ॅडप्टेशन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीच्या एका अधिकाऱ्याने दत्तक म्हणून मुलांच्या तुलनेत मुलींची मागणी वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अधिकाधिक लोकांना मुलीच दत्तक म्हणून हव्या आहेत, हे उत्साहवर्धक असल्याचे हा अधिकारी म्हणाला.

Web Title: Citizens should adopt daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.