राजस्थानमध्ये भूकंप, आवाज ऐकताच घरातून बाहेर पळाले नागरिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:55 PM2018-07-08T17:55:38+5:302018-07-08T18:01:11+5:30
जयपूरच्या संभाग येथे रविवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. शाहरपुरा, सिकरच्या निमका ठाणे परिसरात आणि जयपूरजवळील अलवर येथे भूंकपाचे धक्के जाणवले.
जयपूर - जयपूरच्या संभाग येथे रविवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. शाहरपुरा, सिकरच्या निमका ठाणे परिसरात आणि जयपूरजवळील अलवर येथे भूंकपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. जयपूरपासून 10 किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
जयपूरपासून 10 किमी अंतरावरील संभाग येथे रविवारी सकाळी 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप घडून आला. भूकंपाचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी घरातून बाहेर पलायन केले. रविवारची सुट्टी असल्याने शाळेतील विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी घरीच बसले होते. मात्र, या भूकंपाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कुठलिही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. दरम्यान, हवामान खात्याकडून भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे.