CAA Protest : डाव्यांची भारत बंदची हाक, बिहारमध्ये ट्रेन अडवल्या, उत्तर प्रदेशात कलम 144 लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 10:59 AM2019-12-19T10:59:42+5:302019-12-19T11:07:20+5:30

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळून आला आहे.

citizenship amendment act : citizenship protests live section 144 imposed in different states | CAA Protest : डाव्यांची भारत बंदची हाक, बिहारमध्ये ट्रेन अडवल्या, उत्तर प्रदेशात कलम 144 लागू

CAA Protest : डाव्यांची भारत बंदची हाक, बिहारमध्ये ट्रेन अडवल्या, उत्तर प्रदेशात कलम 144 लागू

Next

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळून आला आहे. डावे आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. याचा प्रभाव उत्तर प्रदेश, बिहारपासून ते बंगळुरूपर्यंत पाहायला मिळतोय. डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी समर्थन दिलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दिल्लीतील 14 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.

लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे, असं डीएमआरसीनं ट्विट करत सांगितलं आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 



नागरिकत्व कायद्यासंदर्भात पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी हिंसक प्रदर्शन झालेलं नाही. तसेच डावे रामलीलापासून लेडी ब्रेबॉर्न कॉलेजपर्यंत मार्च काढणार आहे. तसेच बुद्धिजिवी वर्ग रामलीला मैदान ते हॉग मार्केटपर्यंत मार्च काढणार आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनीही मुंबईत एक आघाडी तयार केली असून, एनआरसीविरोधात ते प्रदर्शन करणार आहेत. 'आम्ही भारताचे लोक' अशा आघाडीवर हा मोर्चा बनवला असून, ऑगस्ट क्रांती मैदानात विरोध प्रदर्शन केलं जाणार आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात डावे आणि मुस्लिम संघटनांनी बंगळुरू बंदचं आयोजन केलं होतं. त्यामुळे टाऊन हॉल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बंगळुरूच्या ग्रामीण भागासह राजधानीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

 

Web Title: citizenship amendment act : citizenship protests live section 144 imposed in different states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.