नागालॅँडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे भूत भाजपाच्या मानगुटीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:30 AM2019-02-11T05:30:11+5:302019-02-11T05:35:02+5:30

घटक पक्षांना बुस्टर देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपासह समर्थकांना यंदाची निवडणूक अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीनवेळा लोकसभेची जागा जिंकणा-या एनपीएफने (नागा पीपल्स फ्रंट) नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आग ओकायला सुरुवात केल्याने एनडीपीपीसाठी (नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) हा मुद्दा डोकेदुखी ठरू पाहत आहे.

Citizenship (Amendment) Bill in Nagaland! | नागालॅँडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे भूत भाजपाच्या मानगुटीवर!

नागालॅँडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे भूत भाजपाच्या मानगुटीवर!

Next

- कुंदन पाटील

कोहिमा : घटक पक्षांना बुस्टर देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपासह समर्थकांना यंदाची निवडणूक अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीनवेळा लोकसभेची जागा जिंकणा-या एनपीएफने (नागा पीपल्स फ्रंट) नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आग ओकायला सुरुवात केल्याने एनडीपीपीसाठी (नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) हा मुद्दा डोकेदुखी ठरू पाहत आहे. साहजिकच भाजपाविषयी तिथल्या घटक पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे.
भाजपा, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेससह एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट), एनडीपीपी (नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी), एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी), जेडीयु (जनता दल युनायटेड), आप, तृणमूल काँग्रेस, लोक जनशक्ती पार्टी, युएनडीपी (युनायटेड नागा डेमोक्रेटिक पार्टी) आणि एनएनडीपी (नागा नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी) यंदाच्या निवडणुकीत सक्रिय आखाड्यात राहणार आहेत.
भाजपाप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) सध्या एनडीपीपीचे सूत जुळले आहे. विद्यमान खासदार थोकेओे येप्थॉमी (एनडीपीपी) यांना एनपीएफचे आव्हान असणार आहे. गेल्या दोन वर्षात नागालँडच्या जनतेने अनेक सत्तांतरांची मालिका अनुभवली.
२०१४ मध्ये एनपीएफकडून नेइफिऊ रिओ हे खासदार म्हणून निवडून आले होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी एनपीएफ सोडली आणि राज्यातल्या राजकारणात आले. तेव्हा त्यांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केला. तिकडे एनपीएफसोबत १५ वर्षांपासून असलेली आघाडी भाजपाने तोडली आणि एनडीपीपीशी घरोबा केला. फेब्रुवारी २०१८ मध्ये नागालँड विधानसभेची निवडणूक झाली. रियो बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले.
६० पैकी ५९ जागांसाठी मतदान झाले आणि निकालात रियोंच्या एनडीपीपीला एनडीएफने ओव्हरटेक केले. २७ जागा एनडीएफने जिंकल्या. त्याखालोखाल एनडीपीपी १८, भाजपा १२, एनपीपीने २ जागा राखल्या. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
सत्तेचे पाय खोलवर रोवण्यासाठी भाजपाने एनडीपीपीला पाठिंबा
दिला आणि नेइफिऊ रिओ यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे
आणला. एनडीएफला सर्वाधिक जागा मिळाल्या असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा एनडीएफचे तत्कालिन मुख्यमंत्री टी.आर.जेलियांग राजीनामा देत विरोधी बाकावर बसणे पसंत केले. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही म्हणून तत्कालिन प्रदेशाध्यक्ष के.थेरी यांनी पदाचा राजीनामा दिला.

...आणि भाजपाचे दिवस फिरले
केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. ही बाब नागालँडच्या जनतेच्या जिव्हारी लागली. या विधेयकाविरुद्ध जनमत पेटले आहे. विधेयकाविरुद्ध भाजपाच्या आघाडीत असणाºया एनपीएफसह स्थानिक घटक पक्षांनी विधेयक
ठोकरले आहे. या विधेयकामुळे जनता एनडीपीपीवर डोळे वटारून आहे. साहजिकच भाजपाच्या या विधेयकाचा स्वीकार करणे एनडीपीपीला सोयीचे नाही. म्हणून खुद्द मुख्यमंत्री नेइफिऊ रिओ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विधेयक फेटाळून लावले. रिओंच्या या भूमिकेने भाजपाला ‘बुरे दिन’ सुरू झाल्याचे उघड झाले.

Web Title: Citizenship (Amendment) Bill in Nagaland!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.