नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

By Admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:42+5:302016-03-11T22:26:42+5:30

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल्

Citizenship; Water brought from a distance | नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

googlenewsNext
गाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी नाही
मनपाच्या जलवाहिनीची गळती दुरूस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. आधीच दोन दिवस पाणीपुरवठा न झालेल्या भागात दुरुस्तीमुळे आणखी एक-दोन दिवस उशीराने म्हणजे तब्बल चार-पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीतही मनपाकडून नागरिकांचे हाल टाळण्यासाठी कोणतीही पर्यायी पाणपुरवठा व्यवस्था केली जात नाही. टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी देखील मनपाकडून घेतली जात नाही. तर नगरसेवकही सोयीस्करपणे प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो.

Web Title: Citizenship; Water brought from a distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.