शहर सिंगल क्राईम बातम्या..
By admin | Published: September 2, 2015 11:32 PM2015-09-02T23:32:01+5:302015-09-02T23:32:01+5:30
महिलेने केले औषध प्राशन
Next
म िलेने केले औषध प्राशन सोलापूर : आर्य चाणक्य नगर सैफुल येथील राहत्या घरी घरगुती कारणावरून मनीषा लक्ष्मण पाटील (वय 30) या महिलेने विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार मंगळवारी रात्री 11 वा. घडला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. स्टोव्हच्या भडक्यात महिला जखमी सोलापूर : हत्तुरेवस्ती येथील स्वामी विवेकानंद नगरातील राहत्या घरी स्वयंपाक करीत असताना उडालेल्या स्टोव्हच्या भडक्यात कविता सूर्यकांत कस्तुरे (वय 26) ही महिला गंभीर जखमी झाली. हा प्रकार मंगळवारी रात्री 11 वा. घडला. पती सूर्यकांत कस्तुरे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. टमटम-टँकरची धडक ; तिघे जखमी सोलापूर : मार्केट यार्डकडून बोरामणी चौकाच्या दिशेने जाणार्या टमटमला पाठीमागून येणार्या टँकरने दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाले. हा अपघात दुपारी 2 वा. घडला. अनुसया दौरप्पा म्हेत्रे (वय 45 रा. ईरण्णा वस्ती), भीमाबाई सिद्राम वम्मेवरू (वय 40) युवराज नवनाथ भोसले (वय 49, दोघे रा. रामवाडी, धोंडिबा वस्ती) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. मुलीकडून विषारी औषध प्राशन सोलापूर : मोहननगर कुंभार गल्ली येथील राहत्या घरी मोनाली मोहन बोराडे (वय 20) या मुलीने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार बुधवारी सकाळी 7.30 वा. घडला. तिला उपचारासाठी भाऊ सूर्यकांत बोराडे याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. कारच्या धडकेत तरुण ठार सोलापूर : पुणे-हैदराबाद रोडवरील रघोजी ट्रान्सपोर्ट समोरुन रस्ता ओलांडत असताना अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दीपक र्शीरंग साळुंके (वय 22, रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती) हा तरुण ठार झाला. हा अपघात दि.29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 वा. घडला. अंबादास साळुंखे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. शिंदीच्या नशेत तरुणाने घेतला गळफास सोलापूर : लाकूड बाजार, झोपडप?ी येथे राहत्या घरी हुसेन हबीब नदाफ (वय 26) सिंदीच्या नशेत हुसेन हबीब नदाफ (वय 26) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी 5 वा. घडला. घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घरातील पत्र्याच्या वाशाला दोरीने गळफास घेतला. त्याला फिरोज नदाफ याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील राहत्या घरी धुळप्पा शंकर सुतार (वय 40) याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी सकाळी 6.30 वा. घडला. त्याला उपचारासाठी अशोक बिराजदार यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिल चौकीत नोंद झाली आहे. तरुणास मारहाण करून लुटलेसोलापूर : हरिभाई देवकरण शाळेच्या मागील रोडवरून पायी चालत जात असताना रिक्षा चालक व अन्य दोघांनी दीपक व्यंकटेशराव पुजारी (वय 25, रा. भाग्यर्शी पार्क, विमानतळाजवळ, सोलापूर) यास मारहाण करून लुटले. हा प्रकार 31 ऑगस्ट रोजी रात्री 8.45 वा. घडला. अज्ञात लोकांनी तोंड दाबून मारहाण करीत 10 हजारांचा हँडसेट व दोन हजार रुपये रोख अशी एकूण 12 हजारांची लूट केली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोसई कोकरे करीत आहेत. दहा हजारांची पर्स पळवली सोलापूर : सात रस्ता येथील लक्ष्मी को-ऑप. बँकेतून काढलेली 10 हजारांची रक्कम शिल्पा वैभव कुलकर्णी (वय 40, रा. 70 अंत्रोळीकर नगर भाग-2) या पर्समध्ये घेऊन गाडीच्या डिकीत ठेवत असताना अज्ञात मोटरसायकलस्वाराने हिसका मारून पळवली. हा प्रकार मंगळवारी दुपारी 1.15 वा. घडला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर कलाल करीत आहेत.