शहर सिंगल क्राईम बातम्या..
By admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:47+5:302015-09-03T23:52:47+5:30
महिलेस मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा
Next
म िलेस मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा सोलापूर : समाधाननगर येथील प्लॉटवर गेले असता ताहिरा चाँद पटेल (वय 48, रा. पोलीस मुख्यालय) यांना अज्ञात कारणावरून मारहाण करून मंगळसूत्र घेतल्याप्रकरणी लता राजू बंडा, राजू बंडा, चाँद बाबुलाल शेख व त्याच्या आईविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी 12 वा. घडला. तपास पो.ना. मंठाळकर करीत आहेत. मारहाणप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा सोलापूर : कुमठा नाक्याकडे जात असताना नवसमता सोसायटीजवळ छोटा हत्ती (क्र.एमएच.12 एचडी-1357) पाठीमागे घेत असताना मोटरसायकलला धडक बसल्याने दोघे जखमी झाले. याचा जाब विचारत असताना 8 ते 9 जणांनी शिवीगाळ करीत अमोल कल्याणी कोटीवाले (वय 31 रा. योगीनाथ सोसायटी, शेळगी) यांना लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि रणदिवे करीत आहेत. रिक्षा चालकाकडून प्रवाशाची फसवणूक सोलापूर : पेट्रोल संपल्याचा बहाणा करून संगमेश बसप्पा भोपळे (वय 31, रा. हुलसूर ता. बसवकल्याण) यांच्याकडून 1 हजाराची नोट घेऊन पळून गेल्याप्रकरणी अफसर चाँद पटेल (रा. नई जिंदगी) व एक अनोळखी रिक्षाचालक याच्याविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी 1.30 ते 11.30 दरम्यान घडला. सोरेगाव येथील डॉ. कुंभार यांच्याकडे उपचारास जात असताना हॉटेल यतिराज येथील पेट्रोल पंपाजवळ रिक्षा (क्र.एम.एच.13 बी.व्ही. 0669) चालकाने पेट्रोल संपल्याचे सांगितले. 1 हजाराची नोट घेऊन चिल्लर आणतो म्हणून निघून गेला तर चाँद पटेल याने फसवणूक केली. तपास पो.हे.कॉ. सय्यद करीत आहेत. जमावबंदीचा आदेश मोडल्याने गुन्हा दाखल सोलापूर : सात रस्ता येथून रेल्वे स्टेशनकडे मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून घोषणा देत हॉर्न वाजवत जबावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 17 ते 20 जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी 7.45 वा. घडला. ओमशंकर मनमोहन पांडे, (वय 20, रा. आसरा), काशिनाथ सुभाष चिंचोळे (वय 24, रा. 97 पाटील नगर), सुभाष शेजवाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये क्रेनला समोर फुलांचा मोठा हार लावण्यात आला होता. तपास पो.हे.कॉ. कांबळे करीत आहेत. अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन सोलापूर : भवानी पेठ मड्डीवस्ती, शांतीनगर येथील राहत्या घरी लक्ष्मी बाबू नाटेकर (वय 20) या महिलेने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी 11.30 वा. घडला. तिला उपचारासाठी सासू सुगलाबाई नाटेकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. पाणी समजून विषारी औषध प्राशन सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथील राहत्या घरी कविता रणजित माने (वय 21) या महिलेने पाणी समजून विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी 11 वा. घडला. तिला त्रास होऊ लागल्याने रणजित माने यांनी कळमण येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. पतीकडून पत्नीस मारहाण सोलापूर : दारू पिण्यास पैसे देण्याच्या कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत अनुराधा चंद्रशेखर कल्याणम ( वय 37, रा. नीलमनगर, एमआयडीसी) ही महिला जखमी झाली. हा प्रकार गुरुवारी दुपारी 3 वा. घडला. पतीने डोक्यास धरून भिंतीवर धडकावले. तिला जखमी अवस्थेत नागमणी कल्याणम यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. दारूच्या नशेत पेटवून घेण्याचा प्रयत्न सोलापूर : वांगीरोडवरील भूषण नगरातील प्लॉट नं.58 या राहत्या घरी संजय पंडित साळुंखे (वय 43 ) याने गुरुवारी दुपारी 3 वा. दारूच्या नशेत स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्याला उपचारासाठी पत्नी महानंदा साळुंखे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.