शहर सिंगल बातम्या..

By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30

र्शावणी वेद सप्ताहचे आयोजन

City Single News .. | शहर सिंगल बातम्या..

शहर सिंगल बातम्या..

googlenewsNext
शावणी वेद सप्ताहचे आयोजन
सोलापूर : आर्य समाजाच्या वतीने दि. 6 ते 12 सप्टेंबरदरम्यान आर्य समाज मंदिर, बुधवार पेठ, कस्तुरबाई मंडई येथे र्शावणी वेद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वेद प्रवक्ता सत्येंद्रसिंह आर्य, भजनोपदेशक संदीप वैदिक, राजवीर विद्यावाचस्पती हे मार्गदर्शन करणार आहेत. दररोज सकाळी 8.30 ते 11.30 भजनोपदेश व प्रवचन तर रात्री 8 ते 9.30 दरम्यान भजनोपदेश वेद प्रवचन होणार आहे.

कुमठे प्रशालेत पर्यावरण जनजागृती
सोलापूर : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जयर्शी माने, मुख्याध्यापक सतीश दहिटणकर, प्रकाश काशीद, विजय सरडे, राष्ट्रविकासचे मुख्याध्यापक बिराजदार उपस्थित होते. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना सुलभ हप्त्याने सायकलींचे वाटप करण्यात आले.

फेडरेशनच्या अध्यक्षपदी बाबासाहेब कारंडे
सोलापूर : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑप़ फेडरेशनच्या चेअरमनपदी बाबासाहेब कारंडे यांची निवड झाल्याबद्दल एस.के. फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक रविकांत कोळेकर, किरण चंदनशिवे, बिपीन चाबुकस्वार, कपिल डोळसे, किरण माने, विवेक तळभंडारे, सचिन उबाळे, आकाश दोड्डी, बंटी गायकवाड, प्रिन्स चंदनशिवे, गणेश आसादे, विजय माने आदी उपस्थित होते.

अनुदान लाटणार्‍यांवर कारवाईची मागणी
सोलापूर : जिल्?ातील 162 पैकी 52 वसतिगृहे बोगस असल्याने शासनाची फसवणूक झाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना इतका मोठय़ा घोटाळ्याने जनता भयभीत झाली आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे यश
सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्रातर्फे राष्ट्रीय विज्ञान आणि राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ट्रेझर हंट व निबंध स्पर्धेत दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये चैतन्य स्वामी, वसीम तांबोळी, सचिन खांडेकर, विशाल भांगे, सूरजसिंह माने या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विजेत्यांना आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

र्शी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव
सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुरस्कृत नाभिक समाज होटगी रोड, हत्तुरेनगरच्या वतीने दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान र्शी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दिनकर गोरे हे उपस्थित राहणार आहेत. सर्व नाभिक भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अलका ताठे व संतोष राऊत यांनी केले आहे.

व्हॅलेंटाईन स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात
सोलापूर : व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी र्शीकृष्ण, राधा, कंस आणि वासुदेव यांची वेशभूषा परिधान करून दहीहंडी फोडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नागेश शेंडगे, उपाध्यक्षा यमुना दिड्डी, सचिव संतोष गड्डम, मुख्याध्यापिका जी.एच. कल्याणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा मंदिरात गोपाळकाला
सोलापूर : महात्मा विद्या मंदिरात गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी र्शीकृष्णाच्या गीतांवर नृत्य सादर केले तर अन्य ‘विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला’ या गीतावर लेझीम नृत्य सादर केले. यावेळी मुख्याध्यापिका सविता गायकवाड, र्शीनिवास चौगुले, पार्वती कोथिंबिरे आदी उपस्थित होते.

ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी
सोलापूर : ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी मल्लिनाथ जळकोटे, संजय जतकर, राहुल जतकर, खंडू सुरवसे, प्रशांत चिंचोले, अमृत झुरळे, कांचन ननवरे, धरती घोरपडे, पूजा राजोळे, समीना बागवान यांनी दहीहंडी फोडली. यावेळी हुसेन नदाफ, सुभाष माने, शिवानंद सिद्दमल्ले, अलका अचलेरे, तांबोळी आदी उपस्थित होते.

ए.एम. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल
सोलापूर : ए. एम. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मलकप्पा कोळी, सिद्धराया कोळी, प्राचार्या अपर्णा उंबराणी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधाच्या वेशात दहीहंडी फोडली.

र्शाविका हायस्कूलमध्ये पंतप्रधानांचा संवाद
सोलापूर : विकासनगर जवळील चतुरबाई र्शाविका विद्यालय, महावीर हायस्कूल व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शालेय विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद दाखविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका रूपाली चंडके, मुख्याध्यापिका उज्ज्वला शेटे, धन्यकुमार चेंडके, न्यू इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षिका पद्मा जैन आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र खोत, मनोजकुमार गायकवाड यांनी पर्शिम घेतले.

दयानंद शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट
सोलापूर : दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाला पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.पी. गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. विजय बिराजदार, माध्यमिक विभागाचे विस्तार अधिकारी सूर्यकांत सुतार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने, वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी.आर. खैरे, डॉ. आर. एन. मुळीक, डॉ. व्ही.पी. उबाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अरूण खांडेकर यांनी केले तर आभार प्रा. सिद्धाराम मुडगी यांनी मानले.

थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने रक्तदान
सोलापूर : थोरला मंगळवेढा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 81 जणांनी रक्तदान केले. यावेळी शिवाजी पिसे, अमोल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सदानंद येलुरे, सुनील शेळके, महेश धाराशिवकर, रमेश खरात, मंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर, संकेत पिसे, अनिकेत पिसे, उज्ज्वल दीक्षित, मनोज दीक्षित, मुस्ताक मुजावर, अरूण कुलकर्णी, खलील शेख हे उपस्थित होते.

Web Title: City Single News ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.