आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 02:50 AM2018-08-02T02:50:27+5:302018-08-02T02:51:48+5:30

आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशारा दिला आहे.

Civil war in Assam, if left out of 4 million people in Assam, Mamata Banerjee | आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी 

आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी 

Next

नवी दिल्ली : आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशारा दिला आहे.
ममतांचे विधान समाजात दुही व विद्वेष निर्माण करणारे असल्याची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाने आसाममध्ये पोलीस ठाण्यात दाखल केली. बंगाली लोक आसाममध्ये शांततेने जगतात, ममता यांनी आसामची काळजी करू नये, या देशात कोणत्या प्रकारची यादवी माजेल हे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट करावे, असे भाजयुमोने म्हटले आहे.
आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा म्हणाले आहे की, यादवी माजावी म्हणून लोकांना डिवचण्याचा उद्योग मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने करता कामा नये. आसाममध्ये शांतता असून, ममता यांच्या वक्तव्यांचा राज्यात काहीही परिणाम होणार नाही.

Web Title: Civil war in Assam, if left out of 4 million people in Assam, Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.