सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:10 AM2023-08-15T10:10:27+5:302023-08-15T10:14:02+5:30
७७ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासियांना संबोधित केले. 90 मिनिटे त्यांनी भाषण केले. या भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले.
देशाचा स्वातंत्र्य दिवस आज लाल किल्ल्यावर मोठ्या थाटात साजरा झाला. ७७ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासियांना संबोधित केले. 90 मिनिटे त्यांनी भाषण केले. या भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. यावेळी मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचीही बिजे रोवली आहेत. या सोहळ्याला विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
मोदींनी आपल्या तीन कमिटमेंट सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावर भाष्य करत विरोधकांवर शरसंधान साधले आहे. तीस वर्षांनी देशाला बहुमताचे, ताकदवर सरकार हवे असे जनतेला वाटले होते. आज देशात तीन दशकांनी ताकदवर सरकार आले आहे. तेच देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकते, असे मोदी म्हणाले.
लाल किल्ल्यावरून मोदी विरोधकांना लक्ष्य करणार याची कल्पना आधीच विरोधकांना होती, यामुळे खर्गेंनी सोहळ्याला अनुपस्थिती लावली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे खर्गेंना काँग्रेसच्या कार्यक्रमात जायचे होते, असे कारण देण्यात येत आहे. एनबीटीनुसार खर्गेंनी सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ल्यावरील सोहळ्याला गैरहजर राहिल्याचे म्हटले आहे. काहीही कारण असले तरी खर्गेंची रिकामी खूर्ची चर्चेचा विषय ठरली होती.
#WATCH कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने स्वतंत्रता दिवस पर दिल्ली कांग्रेस मुख्यालय में तिरंगा फहराया।#IndependeceDay2023pic.twitter.com/MuAAiXxzo4
— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2023