CJI D. Y. Chandrachud: “खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:17 PM2023-03-02T18:17:00+5:302023-03-02T18:17:29+5:30

CJI D. Y. Chandrachud: एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

cji dy chandrachud rebukes scba president vikas singh says has never been browbeaten leave this court right now | CJI D. Y. Chandrachud: “खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले?

CJI D. Y. Chandrachud: “खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले?

googlenewsNext

CJI D. Y. Chandrachud: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासोबत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायालयात तसेच खंडपीठांसमोर महत्त्वाच्या याचिका सुनावणीसाठी येत आहेत. अशातच एका याचिकेच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड एका ज्येष्ठ वकिलांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही, तर खंडपीठ झुकेल, असा विचार मनातही आणू नका, असा इशाराच सरन्यायाधीशांनी दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. विकास सिंह यांनी बार असोसिएशनच्या जमीन प्रकरणाचा प्रश्न यादीवर लागत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. विकास सिंह यांनी हे प्रकरण सरन्यायाधीश, न्यायाधीश पीएस नरसिंहा आणि न्यायाधीश जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर उपस्थित करण्याची मागणी केली होती. सहा महिन्यांपासून हा प्रश्न खंडपीठासमोर येत नाही आहे. मात्र विकास सिंह यांच्या मागणीवर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक केली. 

खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा

सरन्यायाधीश चंद्रचूड हे विकास सिंह यांच्यावर चांगलेच संतापले. विकास सिंह यांनी शांतपणे आपल्या जागेवर बसावे, असे चंद्रचूड यांनी बजावले. विकास सिंह यांना इशारा देत, मोठ्या आवाजात बोलायचे असेल तर माझ्या न्यायालयातून निघून जावे. हा विचार नका करु की, तुमच्या भूमिकेमुळे खंडपीठ घाबरून जाईल. झुकेल. अशा पद्धतीने कुणाचाही अपमान केलेला नाही, माझ्या कारकिर्दीचे शेवटचे दोन वर्ष राहिले आहेत. याकाळात कुणाचाही अपमान करु इच्छित नाही. तुम्ही आवाज वाढवू नका. अध्यक्ष या नात्याने तुम्ही बार असोसिएशनचे नेतृत्व केले पाहिजे. मात्र तुम्ही केवळ वाद घालत असल्याचे दिसत आहे. तुम्ही अनुच्छेद ३२ अतंर्गत याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली जमीन बार असोसिएशनला मिळावी, अशी तुमची मागणी आहे. आम्ही या प्रकरणावर योग्य वेळी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले. या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली १.३३ एकर जमीन सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनला मिळावी आणि त्या जमिनीवर वकिलांसाठी चेंबर बनविण्यात यावेत, अशी एक जुनी मागणी वकिलांची आहे. ही जमीन सर्वोच्च न्यायालयाच्या अगदी जवळ असून न्यायालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आहे. या जमिनीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन यांच्यात खडाजंगी झाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cji dy chandrachud rebukes scba president vikas singh says has never been browbeaten leave this court right now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.