"मुसाफिर हैं हम भी...", न्यायमूर्ती कृष्ण मुरारींच्या निरोप समारंभात CJI डीवाय चंद्रचूड यांचा शायराना अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 03:40 PM2023-07-08T15:40:44+5:302023-07-08T15:41:22+5:30

आपले सहकारी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निरोपाच्या भाषणात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बशीर बद्र यांचा 'शेर' वाचून दाखविला.

cji dy chandrachud recites shayari supreme court justice murari judge farewell | "मुसाफिर हैं हम भी...", न्यायमूर्ती कृष्ण मुरारींच्या निरोप समारंभात CJI डीवाय चंद्रचूड यांचा शायराना अंदाज

"मुसाफिर हैं हम भी...", न्यायमूर्ती कृष्ण मुरारींच्या निरोप समारंभात CJI डीवाय चंद्रचूड यांचा शायराना अंदाज

googlenewsNext

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनद्वारे शुक्रवारी आयोजित न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krishan Murari) यांच्या निरोप समारंभात भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) हे शायराना अंदाजात दिसून आले. यावेळी आपले सहकारी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निरोपाच्या भाषणात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बशीर बद्र यांचा 'शेर' वाचून दाखविला.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. दरम्यान, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड  आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी या दोघांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एकत्र काम केले होते. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आपल्या भाषणात म्हणाले, 'मुसाफिर हैं हम भी, मुसाफिर हो तुम भी, किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी.' तसेच, घटनापीठाच्या खटल्यांची सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या मेहनतीचे आणि तंत्रज्ञान शिकण्याच्या उत्सुकतेचे कौतुक सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केले.

"आपके साथ कुछ लम्हे काई यादें बतौर इनाम मिले, एक सफर पर निकले और तजुर्बे तमाम मिले", असे म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी नेहमी शांत होते, न्यायाधीशांसाठी आदर्श आचरण असल्याचे सांगितले. याचबरोबर, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांनी आपल्या भाषणात घटनापीठावर बसण्याचा आपल्या अनुभव आठवला, ज्यावेळी भारताच्या सरन्यायाधीशांनी ते पेपरलेस घोषित केले होते. ते म्हणाले की, "जेव्हा मी घटनापीठावर बसलो होतो, तेव्हाच सरन्यायाधीशांनी अचानक घोषणा केली की, हे घटनापीठ ग्रीन बेंच असेल."

न्यायमूर्ती कृष्ण मुरारी पुढे म्हणाले की, "मी त्यांच्या कानात म्हणालो की, मला कॉम्प्युटर ऑपरेशनबद्दल काहीही माहिती नाही. पण मला सरन्यायाधीश म्हणाले, मी तुम्हाला शिकवतो. पहिला दिवस खूपच लाजिरवाणा होता. मला ते चालवता येत नव्हते. मग भाई नरसिंहाने आपला आयपॅड वाकवला जेणेकरून मला दिसेल. त्या संध्याकाळी, मी माझ्या कायद्याच्या क्लार्कंना मार्गदर्शन करायला सांगितले. त्यानंतरच मी घटनापीठाकडे जाऊ शकलो."

Web Title: cji dy chandrachud recites shayari supreme court justice murari judge farewell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.