चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:35 PM2024-11-08T16:35:20+5:302024-11-08T16:36:04+5:30

CJI DY Chandrachud Retired: चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे.

CJI DY Chandrachud's last working day is over! He bowed to everyone and said, sorry if you have been hurt... | चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...

चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे आजपासून निवृत्त झाले आहेत. आज त्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरचा शेवटचा दिवस होता. चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्यांक दर्जावर त्यांनी महत्वाचा निर्णय दिला आणि सर्वांचा निरोप घेतला. 

यावेळी चंद्रचूड भावूक झाले होते. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते सर्वांना मस्तक झुकवून नमस्कार करत आहेत. यावेळी अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक वकिलांनी ऑनलाईन स्ट्रिमिंगद्वारे चंद्रचूड यांना निरोप दिला. 

निरोपावेळी चंद्रचूड यांनी म्हटले की, ''जर कोणाला दुखावले असेल तर मी माफी मागतो.'' चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. यावेळी त्यांनी काही ऐतिहासिक निर्णय दिले. राम मंदिर, इलेक्टोरल बाँड, समलैंगिक विवाह, आर्टिकल ३७० असे अनेक निर्णय त्यांनी दिले. महाराष्ट्रातील राजकीय वाद चंद्रचूड यांच्याच न्यायालयात आला होता. परंतू, त्यावर चंद्रचूड यांना निर्णय करता आला नाही. 

इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?...
इतिहास माझ्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसं करेल? मी काही वेगळं करू शकलो असतो का? न्यायाधीश आणि कायदे क्षेत्रात येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी मी कोणता वारसा ठेवू जाईन? असे प्रश्न पडत असल्याचे सरन्यायाधीशांनी महिनाभरापूर्वी म्हटले होते. यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि कदाचित यातील काही प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाही, असे ते म्हणाले होते. 

Web Title: CJI DY Chandrachud's last working day is over! He bowed to everyone and said, sorry if you have been hurt...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.