आमदार असल्याचे सांगितले, अधिकाऱ्यांना दरडावले, पश्चिम बंगालच्या विधानसभेत तोतया आमदाराचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:48 AM2023-02-16T11:48:56+5:302023-02-16T11:49:55+5:30
West Bengal Assembly: विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर होत असताना एक व्यक्ती आमदार असल्याचे सांगून विधानसभेत घुसल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला आहे.
विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर होत असताना एक व्यक्ती आमदार असल्याचे सांगून विधानसभेत घुसल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला आहे. या व्यक्तीने अवैधपणे विधानसभेत प्रवेश केला. याबबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना ही घटना घडली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यक्तीने गेटवर स्वत: एक आमदार असल्याचे सांगितले, त्यानंतर ती व्यक्ती लॉबीमध्ये घुसली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आधी त्या व्यक्तीने आपण आमदार असल्याचे सांगितले. मात्र तो आमदार असल्याचे कुठलेही ओळखपत्र देऊ शकला नाही. त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करणाऱ्या मार्शलना सूचना दिली.
या व्यक्तीने तेव्हा सांगितले की, त्याला राज्यपाल सी. स्वी. आनंद बोस यांनी पाठवले होते. अधिकारी म्हणाले की, अधिक तपास केला असता काही वर्षांपूर्वी मुलगा आणि पत्नीला गमावल्यानंतर या व्यक्तीला काही त्रास होत होता. सध्या ते आपल्या नातवासह राहतात. आम्ही सुरक्षेमध्ये राहिलेल्या त्रुटींचा तपास करत आहोत.