प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 05:37 PM2024-11-07T17:37:37+5:302024-11-07T17:38:00+5:30

बैठकीत काही साधूंना जागा मिळाली नाही. यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

Clash at Maha Kumbh Mela meeting in Prayagraj; Saints kicked each other, come injured | प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पुढील वर्षी महाकुंभ मेळा होत आहे. याच्या नियोजनासाठी आखाड्यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीत वाद झाल्याने साधु-संतांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे सरचिटणीस स्वामी हरी गिरी यांनी संघर्ष शांत केला.

मेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात ही बैठक बोलविण्यात आली होती. गिरी हे अध्यक्ष होते. यावेळी आखाड्यांमधील मतभेद समोर आले. महाकुंभ मेळ्यासाठी जमीन वाटपावर चर्चा करण्यासाठी सर्व आखाडे एकत्र आले होते. हाणामारीमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतू यात काहीजण जखमी झाले आहेत. 

बैठकीत काही साधूंना जागा मिळाली नाही. यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. वाद मिटविल्यानंतर एक गट जागा पाहण्यासाठी निघून गेला तर दुसरा गट तिथेच बसून राहिला. हे प्रकरणा आणखी वाढू नये म्हणून गिरी यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. महाकुंभमेळ्याला हजेरी लावायची की बहिष्कार टाकायचा, अशी चर्चा गटांमध्ये सुरु झाल्याचे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. 

Web Title: Clash at Maha Kumbh Mela meeting in Prayagraj; Saints kicked each other, come injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.