आप व भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी; दिल्लीत महापौरपदाची निवडणूक लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:36 AM2023-01-08T07:36:21+5:302023-01-08T07:36:33+5:30

आप नेत्यांच्या मनात असलेल्या पराभवाच्या भीतीमुळे महापौरपदाची निवडणूक झाली नाही, असा आरोप भाजपने केला. 

Clash between AAP and BJP corporators; Delhi mayoral election postponed | आप व भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी; दिल्लीत महापौरपदाची निवडणूक लांबणीवर

आप व भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी; दिल्लीत महापौरपदाची निवडणूक लांबणीवर

Next

नवी दिल्ली : महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी दिल्ली महापालिका सभागृहात गोंधळानंतर आज आप व भाजपच्या नेत्यांनी निदर्शने करून एकमेकांवर आरोप केले. नायब राज्यपालांनी नामनिर्देशित सदस्यांना शपथ देण्यावरून आप व भाजपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. या गोंधळाने महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 

शनिवारी आपच्या आमदार व नगरसेवकांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. तर भाजपच्या नगरसेवकांनी राजघाटसमोर निदर्शने केली. सभागृहात झालेल्या गोंधळाला भाजप व आपचे नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी केला. तर आप नेत्यांच्या मनात असलेल्या पराभवाच्या भीतीमुळे महापौरपदाची निवडणूक झाली नाही, असा आरोप भाजपने केला. 

Web Title: Clash between AAP and BJP corporators; Delhi mayoral election postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.