लहान मुलांच्या भांडणावरुन दोन गटात हाणामारी

By Admin | Published: July 20, 2016 11:49 PM2016-07-20T23:49:50+5:302016-07-20T23:49:50+5:30

जळगाव : लहान मुलांच्या भांडणावरुन खंडेराव नगरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात इरफान शेख व बशीर पिंजारी हे दोन जण जखमी झाले आहेत. इरफानला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरीविठ्ठल नगरात मंगळवारी दुपारी तीन वाजता व रात्री दहा वाजता अशा दोन वेळा ही हाणामारी झाली. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटाकडून रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

Clash of children in two groups | लहान मुलांच्या भांडणावरुन दोन गटात हाणामारी

लहान मुलांच्या भांडणावरुन दोन गटात हाणामारी

googlenewsNext
गाव : लहान मुलांच्या भांडणावरुन खंडेराव नगरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात इरफान शेख व बशीर पिंजारी हे दोन जण जखमी झाले आहेत. इरफानला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरीविठ्ठल नगरात मंगळवारी दुपारी तीन वाजता व रात्री दहा वाजता अशा दोन वेळा ही हाणामारी झाली. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटाकडून रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.
हरीविठ्ठल नगरात गल्लीत लहान मुले खेळत असल्याच्या कारणावरुन दुपारी तीन वाजता हा वाद उफाळून आला. त्यानंतर रात्री दहा वाजता दोन्ही गटतील दहा ते पंधरा जण एकमेकावर चालून आले. त्यामुळे यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इम्रान शेख बिलाल, शेख इस्माईल इम्रान व युनूस शेख यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार बशीर हुसेन पिंजारी यांनी दिली आहे, तर इमरान बशीर पिंजारी, इमराज बशीर पिंजारी, इकबाल बशीर पिंजारी व बशीर हुसेन पिंजारी यांनीही आपणास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची तक्रार इरफान शेख याने केली आहे.
दोन्ही गटाच्या सात जणांवर कारवाई
दोन्ही गटाने बुधवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून एकमेकाविरुध्द तक्रार दिल्याने सात जणांविरुध्द अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली. दरम्यान, वादाचे स्वरुप पाहता पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत पुन्हा प्रतिबंधात्मक कारवाई केली. या घटनेत लहान मुलांच्या खेळण्याचे कारण पुढे आले असले तरी प्रत्यक्षात त्यात मुख्य कारण वेगळेच असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Clash of children in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.