राजस्थानमध्ये संघाच्या शाखेदरम्यान दोन गटांत तणाव, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 05:24 PM2019-07-12T17:24:28+5:302019-07-12T17:25:25+5:30
राजस्थानमधील बुंदी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवेळी दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे.
जयपूर - राजस्थानमधील बुंदी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवेळी दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला असून, त्यामध्ये काही जण हाणामारी करताना दिसत आहेत.
यासंदर्भात माहिती देताना बुंदीचे तहसीलदार बी.एस. राठोड यांनी सांगितले की, आरएसएसची शाखा सुरू असताना शेजारच्याच पार्कमध्ये मुस्लिमांचा एक कार्यक्रम सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.''
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेदरम्यान तणाव निर्माण होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीसुद्धा संघाच्या शाखेवेळी हिंसाचाराच्या घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे.
#WATCH Rajasthan: Clash erupted between two groups during an ongoing session at Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) shakha in Bundi district. pic.twitter.com/eyEXgAmlaC
— ANI (@ANI) July 12, 2019
संघाच्या विचारसरणीचे समर्थक असलेल्या लोकांना संघाकडून हेरण्यात येत आहे. मात्र नोकरीधंद्यामुळे जे लोक संघाच्या प्रात:शाखेला उपस्थित राहू शकत नाहीत, अशा लोकांना आपल्या मोहिमेशी जोडून घेण्यासाठी संघ एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. तसेच तरुणांना त्यांच्या व्यवसायानुसार जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत.
संघाच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांप्रमाणेच अशा तरुणांनाही महत्त्व दिले जात आहे. तसेच संघाशी जोडून घेण्यासाठी केवळ शाखेत जाण्याचीच गरज नाही, तर आपल्या नोकरी धंद्यामधून वेळ काढून सोईनुसार संघाच्या प्रकल्पांमध्ये काम करू शकतात, असा प्रस्तावही तरुणांना देण्यात येत आहे.