Video : अमित शहांच्या रॅलीमध्ये दगडफेक, हाणामारी; कोलकात्यामध्ये तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 07:21 PM2019-05-14T19:21:52+5:302019-05-14T19:31:47+5:30
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे.
कोलकाता : भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र देऊ न शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमले असून तणावाचे वातावरण होते.
यातच सायंकाळी अमित शहा यांचा रोड शो सुरु असताना रॅलीवर दगडफेक करण्यात आली. तसेच भाजपाचे पोस्टर, झेंडे तोडून टाकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली.
West Bengal: Clashes broke out in roadshow of BJP President Amit Shah in Kolkata after sticks were hurled at Shah’s truck. Police later resorted to lathicharge pic.twitter.com/TSvJMAdemQ
— ANI (@ANI) May 14, 2019
सातव्या टप्प्यात लोकसभेच्या उत्ती कोलकाता मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी शहा आले आहेत. येथे त्यांचा रोड शो देखिल होणार आहे. जय श्री राम म्हणत मी कोलकातामध्ये येत आहे, हिंमत असेल तर ममता यांनी अटक करून दाखवावी असे आव्हान शहा यांनी काल दिले होते.
West Bengal: Latest visuals from BJP President Amit Shah's roadshow in Kolkata after clashes broke out. pic.twitter.com/KvS7wlwRky
— ANI (@ANI) May 14, 2019