जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये चकमक; लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 07:56 AM2020-11-19T07:56:50+5:302020-11-19T07:57:43+5:30
Jammu-Kashmir News : जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोल नाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पहाटे पाचच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोल नाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती.
जम्मूचे जिल्हा पोलिल प्रमुख एसएसपी श्रीधर पाटील यांनी सांगितले की, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास दहतवाद्यांनी नगरोटा परिसरातील बान टोलनाक्याजवळ सुरक्षा दलांवर गोळीबार केला. हे दहशतवादी एका गाडीमध्ये लपून बसले होते. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी नगरोटा येथील राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे.
Jammu and Kashmir: Security tightened in Udhampur as an encounter between terrorists and security forces is underway near Ban toll plaza.
— ANI (@ANI) November 19, 2020
(visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/tzbTnJPIua
दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या कारवाईत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीदरम्यान, उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.