आंध्र प्रदेशमध्ये  YSR काँग्रेस आणि TDPच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दगडफेक, वाहने, घरे जाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:35 AM2022-12-17T10:35:46+5:302022-12-17T10:36:53+5:30

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांना आग लावण्यात आली.

Clashes, stone pelting, burning of vehicles, houses between YSR Congress and TDP workers in Andhra Pradesh | आंध्र प्रदेशमध्ये  YSR काँग्रेस आणि TDPच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दगडफेक, वाहने, घरे जाळली

आंध्र प्रदेशमध्ये  YSR काँग्रेस आणि TDPच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दगडफेक, वाहने, घरे जाळली

googlenewsNext

गुंटूर - आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांना आग लावण्यात आली. या हिंसाचारानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बलप्रयोग करावा लागला. दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. टीडीपीने आपल्या नेत्यांवर आणि पक्ष कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

पलनाडूचे एसपी रविशंकर रेड्डी यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता स्थिती नियंत्रणात आली आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक आमदार पिनेली रामकृष्ण रेड्डी यांचे भाऊ वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारावेळी तिथे उपस्थित होते. वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टीडीपीच्या कार्यकर्त्यांच्या दुकानांचीही जाळपोळ करण्यात आली, असा आरोप टीडीपी नेते वेंकटरामी रेड्डी यांनी केला आहे. यादरम्यान, स्थानिक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केली.

यादरम्यान, टीपीपी सरचिटणीस नारा लोकेश यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, वायएसआर काँग्रेसच्या जमावाने पोलिसांच्या पाठिंब्याने टीडीपीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला. हा प्रकार राज्यामध्ये अराजक निर्माण झाल्याचा पुरावा आहे. टीडीपीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या गुंडांना त्वरित अटक केली गेली पाहिजे. आम्ही जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांसोबत उभे आहोत.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुथ चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूरच्या डीआयजींशी संपर्क साधला आहे. तसेच मार्चलामध्ये परिस्थिती चिघळल्यावर पोलीस कारवाई करण्यात का अपयशी ठरले अशी विचारणा केली आहे.  

Web Title: Clashes, stone pelting, burning of vehicles, houses between YSR Congress and TDP workers in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.