बारावीच्या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 04:03 PM2019-03-03T16:03:18+5:302019-03-03T16:12:32+5:30
बारावीच्या बोर्ड परिक्षेचा पेपर देताना एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - बारावीच्या बोर्ड परिक्षेचा पेपर देताना एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये शनिवारी (2 मार्च) ही घटना घडली. गोपी राजू (19) असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो चैतन्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेला जात असताना अचानक छातीत दुखत असल्याची त्याने तक्रार केली होती. परिक्षेसाठी उपस्थिती लावणे महत्त्वाचे असल्याने त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. पेपर सुरू झाल्यानंतर त्याने उत्तर पत्रिकेत उत्तरं लिहायला सुरुवात केली. मात्र लिहिता लिहिता अचानक तो बेंचवरून खाली पडला. उपचारासाठी तातडीने त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. मृत विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
Hyderabad: A student died allegedly of heart attack at examination hall before his 12th board exam. He complained of chest pain a few mins before exam but refused to go to hospital. He entered examination hall & collapsed at his bench. Body sent for post-mortem. Case registered.
— ANI (@ANI) March 2, 2019