शास्त्रीय गायन आणि नृत्याची बहार (भाग २)

By admin | Published: February 18, 2015 11:53 PM2015-02-18T23:53:59+5:302015-02-18T23:53:59+5:30

यानंतर चेन्नई येथील कलावंत राजशेखर व कारेकुडी श्रीराम या कलावंतांच्या कर्नाटक राग संगीतातील व्हायोलिन व मृदंगम या वाद्यांच्या अनोख्या जुगलबंदीची रंगत उपस्थितांनी अनुभविली. राग मोहनमसह सुरू झालेल्या या परस्पर विरोधी वाद्यांची ही जुगलबंदी परस्पर सामंजस्याने रंगली. यशवंत हंपीहोळी यांनी त्यांना मृदंगमवर साथसंगत केली. या महोत्सवाचे सुख:द समापन पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या सुरेल वादनाने झाले. प्रतिभेचे दैवी वरदान असलेल्या या कलावंतांचे कलाविश्व म्हणजे रसिक मनाचा उत्सवच असतो. याची प्रचिती देणारे हे गायन होते. त्यांनी राग भूपच्या रसिल्या बंदिशीने गायनाला प्रारंभ केला. त्यांच्या स्वरमाधुर्याला मिळालेली कल्पकता व चिंतनाची जोड यासह हे गायन खुलत गेले. अर्थभावपूर्ण बंदिशीसह झालेला रागविस्तार, प्रभावी गमक आणि मिंड अंगाने घेतलेली सुरेख सर

Classical Singing and Outdoors (Part 2) | शास्त्रीय गायन आणि नृत्याची बहार (भाग २)

शास्त्रीय गायन आणि नृत्याची बहार (भाग २)

Next
नंतर चेन्नई येथील कलावंत राजशेखर व कारेकुडी श्रीराम या कलावंतांच्या कर्नाटक राग संगीतातील व्हायोलिन व मृदंगम या वाद्यांच्या अनोख्या जुगलबंदीची रंगत उपस्थितांनी अनुभविली. राग मोहनमसह सुरू झालेल्या या परस्पर विरोधी वाद्यांची ही जुगलबंदी परस्पर सामंजस्याने रंगली. यशवंत हंपीहोळी यांनी त्यांना मृदंगमवर साथसंगत केली. या महोत्सवाचे सुख:द समापन पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या सुरेल वादनाने झाले. प्रतिभेचे दैवी वरदान असलेल्या या कलावंतांचे कलाविश्व म्हणजे रसिक मनाचा उत्सवच असतो. याची प्रचिती देणारे हे गायन होते. त्यांनी राग भूपच्या रसिल्या बंदिशीने गायनाला प्रारंभ केला. त्यांच्या स्वरमाधुर्याला मिळालेली कल्पकता व चिंतनाची जोड यासह हे गायन खुलत गेले. अर्थभावपूर्ण बंदिशीसह झालेला रागविस्तार, प्रभावी गमक आणि मिंड अंगाने घेतलेली सुरेख सरगम व आकर्षक तानांची आवर्तने असे त्यांचे सादरीकरण होते. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर नारायण दरेकर तर तानपुऱ्यावर सौरभ आणि यामिनी यांनी संगत केली. सर्व कलावंतांचे स्वागत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार आणि प्रा. सतीश दंडे व किशोर हंपीहोळी यांनी केले. उत्कृष्ट सादरीकरणाने या महोत्सवाची सांगता झाली.

Web Title: Classical Singing and Outdoors (Part 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.