चित्रपट पाहून येताना वर्गमित्रांचा तरुणीवर बलात्कार
By admin | Published: February 28, 2016 01:20 PM2016-02-28T13:20:58+5:302016-02-28T13:36:25+5:30
वर्गमित्रांनीच २३ वर्षीय दलित तरुणीवर सलग दोन आठवडे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तेलंगणमधील करीमनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - वर्गमित्रांनीच २३ वर्षीय दलित तरुणीवर सलग दोन आठवडे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तेलंगणमधील करीमनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे. वीणावंका गावाच्या हद्दीजवळ ही बलात्काराची घटना घडली.
पिडीत तरुणी आणि तिची एक मैत्रीण आरोपींबरोबर चित्रपट बघून घराच्या दिशेने येत होते. त्यावेळी आरोपी दोन्ही तरुणींना निर्जन स्थळी घेऊन गेले. एका तरुणीला आरोपींच्या वाईट हेतुची कल्पना येताच तिने तिथून पळ काढला. मात्र दुस-या तरुणीवर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला व या घटनेचा व्हिडीओ तयार केला.
जी. श्रीनिवास आणि एम अंजाय्यह यांनी बलात्कार केला तर, एम राकेशने या गुन्ह्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. पोलिस अधिकारी बनण्याची महत्वकांक्षा असलेली पिडीत तरुणी आणि आरोपी पोलिस दलात भरती होण्यासाठी एकत्र प्रशिक्षण घेत होते.
व्हिडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी दहा दिवस या तरुणीवर बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी पिडीत तरुणीने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
२४ फेब्रुवारीला संध्याकाळी गावकरी आणि मुलीच्या कुटुंबियांनी आरोपींना मारहाण केली. त्यानंतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बलात्कारासह आरोपींविरोधा एससी/एसटी आणि आयटी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.