सफाईदार इंग्लिश बोलला म्हणून तरुणाला चोपले, राजधानीतील अजब घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 11:58 PM2017-09-11T23:58:50+5:302017-09-11T23:59:08+5:30
इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भल्याभल्यांच्या मनात न्यूनगंड असतो. त्यामुळे कार्यक्रम, चर्चा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले जाते तसेच ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांचा हेवाही केला जातो.
नवी दिल्ली, दि 11 - इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भल्याभल्यांच्या मनात न्यूनगंड असतो. त्यामुळे कार्यक्रम, चर्चा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले जाते तसेच ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांचा हेवाही केला जातो. इंग्लिश चांगलं असणार्यांची आपसूकच काँलर टाइट होते पण सफाइदार इंग्लिश बोलणार्या दिल्लीतील एका तरुणाला पाच जणांच्या टोळक्याने तू चांगलं इंग्रजी का बोलत होतास असा जाब विचारुन चोप दिला आहे. ही घटना ल्युटेन्स दिल्लीमधील एका पंचतारांकित हाँटेलजवळ घडली आहे.
त्याचं झालं असं वरुण गुलाटी हा २२ वर्षांचा तरुण आपल्या दक्ष या मित्राला कँनाँट प्लेस येथील पंचतारांकित हाँटेलमध्ये सोडायला आला होता. दक्षला सोडून त्याने निरोप घेतला आणि त्याला पाच जणांच्या टोळक्याने घेरलं. त्या पाच जणांनी तू सफाईदार इंग्रजीत का बोलत होतास असं विचारुन त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. झालं . शब्दाला शब्द वाढत गेला, त्याचं रुपांतर बाचाबाचीत आणि नंतर वरुणला चोप देण्यात झालं. वरुणला मारल्यानंतर ते पाचही एका गाडीतून पळून गेले. मात्र वरुणने त्यांच्या गाडीचा नंबर टिपून घेतला होता.
वरुणच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नंबरच्या मदतीने आरोपींचा शोध घेतल्यावर त्यांनी तीन आरोपींना अटक केले असून दोघांचा शोध अजून सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले