स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत देशातील शहरांचे क्रमांक जाहीर;पुण्याने जोरदार मुसंडी मारत पटकावले 'हे' स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:41 PM2020-08-20T13:41:32+5:302020-08-20T13:42:32+5:30

सलग चौथ्या वर्षी इंदोर शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे..

Clean Survey 2020 announces the number of cities in the country; Pune is the place in the country that has been hit hard | स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत देशातील शहरांचे क्रमांक जाहीर;पुण्याने जोरदार मुसंडी मारत पटकावले 'हे' स्थान

स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत देशातील शहरांचे क्रमांक जाहीर;पुण्याने जोरदार मुसंडी मारत पटकावले 'हे' स्थान

Next
ठळक मुद्देपिंपरी चिंचवड शहराची सुधारणा, देशात 24 वा क्रमांक तर राज्यात पहिल्या दहामध्ये 

पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात सन २०१९ मध्ये ३७ व्या स्थानावर राहिल्यामुळे पुणे महापालिकेने 'स्वच्छ सर्वेक्षण - २०२०' करिता जोरदार तयारी सुरू केली होती. पुणे शहराने यावर्षी देशात १५ तर महाराष्ट्र राज्यात ४ त्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. गतवर्षापर्यंत २ स्टार मानांकन असलेल्या पुण्याला यावर्षी ३ स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.  सलग चौथ्या वर्षी इंदोर शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे गुजरात आणि मुंबई आहे.
     देशात सन २०१६ पासून सुरू झालेल्या 'स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेत पहिल्या वर्षी ७३, २०१७ मध्ये ४३४,  सन २०१८ मध्ये ४,२०३  तर सन २०१९ मध्ये ४ हजार २३७ शहरांनी सहभाग नोंदविला होता.      

पुणे महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण करिता जोरदार तयारी सुरू केली होती. या स्पर्धेचा निकाल आज म्हणजे गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी ऑनलाइन जाहीर झाला. फाईव्ह स्टार मानांकनासाठी निवड झालेल्या सहा शहरांमध्ये पुण्याची वर्णी लागलेली नसली तरी, यावर्षी जोरदार मुसंडी मारत पुण्याने २ स्टार वरून ३ स्टार मानांकन मिळवत १५ वा क्रमांक मिळविला असल्याचे पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख न्यानेश्वर मोळक यांनी सांगितले आहे. 

.....................

स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराची सुधारणा, देशात 24 वा क्रमांक तर राज्यात पहिल्या दहामध्ये 

पिंपरी : मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा क्रमांक आला आहे. तर, राज्यात पिंपरी शहर पहिल्या दहामध्ये आले असून सातवा क्रमांक आला आहे. सर्वेक्षणाचा  गुरुवारी निकाल जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षी देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता.  
 

.........................
    यावर्षी या स्पर्धेत पहिल्या २० मध्ये आलेल्या शहराची नावे पुढील प्रमाणे: 
१. इंदोर
२. सुरत
३. नवी मुंबई
४. विजयवाडा
५. अहमदाबाद
६. राजकोट
७. भोपाळ
८. चंदिगड
९. जीवीएमसी विशाखा पट्टम
१०. वदोरा
११. नाशिक
१२. लखनौव
१३. ग्वाल्हेर
१४. ठाणे
१५. पुणे
१६. आग्रा
१७. जबलपूर
१८. नागपूर
१९. गाझियाबाद
२०. प्रयागराज
--------
       

Web Title: Clean Survey 2020 announces the number of cities in the country; Pune is the place in the country that has been hit hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.