स्वच्छ प्रतिमेच्या फडणवीसांचे संघाला साकडे
By admin | Published: October 29, 2015 10:02 PM2015-10-29T22:02:50+5:302015-10-29T22:02:50+5:30
अनिकेत घमंडी
Next
अ िकेत घमंडीडोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वच्छ प्रतिमा हा महापालिका निवडणुकीचा मुद्दा केला आहे. बुधवारच्या कल्याण-डोंबिवलीतील सभेत शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतानाच उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिमेकडे पाहून मतदान करण्याचे साकडे घातले. आपण स्वत: स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत संघ स्वयंसेवकांना मागील निवडणुकीत केला तसा दगाफटका न करण्याची आर्त साद फडणवीस यांनी घातली. मुख्यमंत्र्यांनी भर सभेत स्वयंसेवक कसा असतो, हे सांगताना राष्ट्रभक्ती, बलिदान, त्याग आणि स्वच्छ-पारदर्शी कारभार या चतु:सूत्रीचा पुनरुच्चार केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी हे आमचे आदर्श असल्याचेही सांगितले. अर्थात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्याचा संघ कार्यकर्त्यांवर कती परिणाम होईल व त्यांची नाराजी किती दूर होईल, ते मतदानाच्या दिवशी कळेलच. तसेच निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल. किंबहुना, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संघ स्वयंसेवकांची केलेली मिनतवारी कामी आली नाही तर महापालिकेतील पायाभूत सुविधांचा बोजवारा व आपली स्वच्छ प्रतिमा या दोन मुद्द्यांची जोड मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रचाराला दिली. या वेळेस प्रथमच महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चार वेळा तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन सभा घेत आहेत. उद्या (शुक्रवारी) प्रचाराची सांगता होणार आहे, पण त्या आधी दुपारपर्यंत मुख्यमंत्री आणि ठाकरे हे दोघेही महापालिका प्रचाराचे कुरुक्षेत्र लढवणार आहेत. अर्थात, मुख्यमंत्री स्वत: लढाईत उतरल्याने या निवडणुकीत फडणवीसविरुद्ध ठाकरे असा रंग भरला गेला. त्यामुळे निवडणुकीनंतर उभयतांचे संबंध कसे राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे....................