एरंडोल नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम; ११टन कचरा संकलन

By admin | Published: January 8, 2016 11:17 PM2016-01-08T23:17:35+5:302016-01-08T23:17:35+5:30

एरंडोल : परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी अमोल येडगे यांनी ८ जानेवारी २०१६ रोजी स्वच्छता मोहीम राबवून ठिकठिकाणी साचलेला सुमारे ११ टन कचरा संकलित करण्यात आला. सर्व कचर्‍याची धनकचरा डेपोवर विल्हेवाट लावण्यात आली.

Cleanliness campaign by Erandol Municipality; 11 tons of garbage collection | एरंडोल नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम; ११टन कचरा संकलन

एरंडोल नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम; ११टन कचरा संकलन

Next
ंडोल : परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी अमोल येडगे यांनी ८ जानेवारी २०१६ रोजी स्वच्छता मोहीम राबवून ठिकठिकाणी साचलेला सुमारे ११ टन कचरा संकलित करण्यात आला. सर्व कचर्‍याची धनकचरा डेपोवर विल्हेवाट लावण्यात आली.
कासोदा दरवाजा मारुती मंदिरापासून भोई गल्ली, मुजावरवाडा, पाताळनगरी, गांधीपुरा भागातील हलवाई गल्ली, मराठी शाळा क्र.२ परिसर, भवानीनगर इ.भागांची साफसफाई करण्यात आली. ठिकठिकाणी बर्‍याच वर्षापासून साचलेला कचरा उचलण्यात आला.
या मोहिमेत नगरसेवीका व नगरसेवक जैबुन्नीसाबी कादर मुजावर, नफीसाबी शे. रऊफ, सुनील चौधरी, सुभाष मराठे हे सहभागी झाले. अँग्लो उर्दू हायस्कुल व मराठी शाळा क्र.२ चे विद्यार्थी व शिक्षक यांनीदेखील सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता शपथ घेतली व प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. न.पा.तर्फे स्वच्छतादूत म्हणून विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व उघड्यावर शौचालयास न बसता स्वच्छ महाराष्ट्र अभियानांर्गंत राबविल्या जाणार्‍या वैयक्तिक शैचालय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिक्षाधिन जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी अमोल येडग यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Cleanliness campaign by Erandol Municipality; 11 tons of garbage collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.