स्वच्छतेत मुंबईचा नंबर दहावा, म्हैसूर पहिल्या स्थानावर
By Admin | Published: February 15, 2016 03:49 PM2016-02-15T15:49:39+5:302016-02-15T18:57:10+5:30
स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई 10व्या स्थानावर असून म्हैसूरने पहिला क्रमांक पटकावला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.15 - स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई 10व्या स्थानावर असून म्हैसूरने पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वैक्षण पुरस्कारांची घोषणा केली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडलादेखील स्थान मिळालं असून नववा क्रमांक पटकावलाय. ऑक्टोबर 2014मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारच सर्वेक्षण करण्यात आलं. एकूण 73 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात स्वच्छ भारत मिशनसाठी केलेल्या उपाययोजनांच्या आधारावर गुण देण्यात आले आणि त्यानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वेक्षण करताना प्रत्येक घऱात तसंच सार्वजनिक शौचालयासाठी केलेली उपाययोजना, कचरा वाहून नेण्यासाठी तसंचं त्याच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजना या गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात आलं.
टॉप 10 स्वच्छ शहरांची यादी -
1) म्हैसूर - कर्नाटक
2) चंदीगड - पंजाब, हरियाणा
3) तिरुचिरापल्ली - तामिळनाडू
4) नवी दिल्ली
5) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
6) सुरत - गुजरात
7) राजकोट - गुजरात
8) गंगटोक - सिक्कीम
9) पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र
10) मुंबई - महाराष्ट्र
महाराष्ट्रातील इतर शहरांच स्थान -
9) पिंपरी चिंचवड
10) मुंबई
11) पुणे
12) नवी मुंबई
17) ठाणे
20) नागपूर
31) नाशिक
35) वसई - विरार
64) कल्याण डोंबिवली