स्वच्छता क्रमवारीत नवी मुंबई राज्यात पहिली, देशात तिसरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 06:03 AM2020-08-21T06:03:20+5:302020-08-21T06:07:13+5:30
बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने केलेल्या देशभरातील चार हजारांहून अधिक शहरांच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’मध्ये महाराष्ट्रातील एकूण ५६ शहरांनी विविध प्रकारच्या वर्गवारीत पहिल्या १०० शहरांमध्ये स्थान पटकावले. देशातील सर्वात स्वच्छ १०० शहरांच्या क्रमवारीत नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे आणि नाशिक या शहरांनी गतवर्षीच्या तुलनेत मोठी मुसंडी मारून चांगले यश संपादित केले. गतवर्षी देशात सातव्या स्थानावर राहिलेल्या नवी मुंबईने यंदा राज्यात पहिला क्रमांक मिळवत देशात तिसरे स्थान पटकाविले. तर चंद्रपूरने २९ पासून ९ तर नाशिकने ६७ पासून २३ क्रमांक अशी प्रगती केली. गेल्या वर्षी १०० व्या स्थानावर राहिलेल्या धुळे शहराने यंदा १८ व्या स्थानापर्यंत मारलेली उडी विशेष लक्षणीय आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरांनाही क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वरचे स्थान मिळविले. बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली.
दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या ‘स्वच्छता महोत्सव’ या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण’चे निकाल जाहीर केले. तसेच विविध वर्गवारीतील विजेतेही जाहीर केले गेले. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान लाागोपाठ चौथ्या वर्षी पटकावून इंदूरने विक्रम केला. सूरतची दुसऱ्या तर नवी मुंबईची देशपातळीवर तिसºया क्रमांकासाठी निवड झाली.
गतवर्षी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या क्रमवारीत पहिल्या १०० स्थानांमध्ये महाराष्ट्रातील २८ शहरे होती. यंदा ही संख्या वाढून ३६ झाली. मात्र, एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत रज्याची खूप मोठी अधोगती झाली. गेल्या वर्षी अशा १०० शहरांमध्ये राज्यातील तब्बल ६० शहरे होती. यंदा मात्र जेमतेम २० शहरे त्यात स्थान मिळवू शकली.
>१ लाखाहून कमी लोकसंख्येची शहरे
: कराड (१), सासवड (२), लोणावळा (३), पन्हाळा (५), जेजुरी (६), शिर्डी (७), मौदा कॅन्टोनमेंट (८), कागल (९), रत्नागिरी (१०), ब्रह्मपुरी (११), वडगाव (१२), गडहिंग्लज (१३), इंदापूर (१४), देवळाली प्रवरा (१५), राजापूर (१६), विटा (१७), मुरगुड (१८), नरखेड (२३), माथेरान (२४) आणि मलकापूर (२५).
>कॅन्टोनमेंट
बोर्डांची क्रमवारी
देहूरोड (८), अहमदनगर (१२), खडकी (१५), पुणे (२५), औरंगाबाद (२९), काम्पटी (४६) आणि देवळाली (५२).
100
हून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसरा.
इंदूर सलग चौथ्यांदा सर्वांत स्वच्छ शहर
इंदूरने सलग चौथ्यांदा भारतात सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसºया क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रतिनिधित्व करीत असलेले वाराणसी शहर सर्वोत्तम गंगा शहर ठरले आहे. त्या पाठोपाठ कानपूर, मुंगेर, प्रयागराज, हरिद्वार ही शहरे आहेत.
>विविध शहरांची क्रमवारी
स्पर्धेच्या विविध गटांमध्ये पहिल्या
100
मध्ये स्थान मिळविणारी राज्यातील
शहरे व त्यांची क्रमवारी
(कंसात) :
चंद्रपूर (४)
धुळे (९)
अंबरनाथ (१८)
मिरा-भार्इंदर (१९)
पनवेल (२०)
जालना (२२)
भिवंडी-निजामपूर (२६)
कोल्हापूर (३२)
सांगली (३६)
अमरावती (३७)
बार्शी (३८)
अहमदनगर (४०)
नंदुरबार (४१)
भुसावळ (४६)
कुळगाव-बदलापूर (४७)
उदगीर (५५)
वर्धा (५९)
नांदेड-वाघाळा (६०)
सातारा (६१)
जळगाव (६४)
अकोला (६६)
सोलापूर (६७)
परभणी (७०)
यवतमाळ (८८)
इचलकरंजी (८९)
हिंगणघाट (९२)
उल्हासनगर (९४)
गोंदिया (१०४)
अचलपूर (१०६)
बीड (११०)
उस्मानाबाद (१२७)
मालेगाव (१३६)
लातूर (१३७)