विमान उड्डाणाचा मार्ग मोकळा; ५० विमानांसाठी परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 02:06 AM2020-05-25T02:06:24+5:302020-05-25T06:30:51+5:30
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवे नियम जाहीर केले आहेत.
मुंबई : राज्यातील विमान सेवेबद्दलची अनिश्चितता संपली असून, सोमवारपासून ५० व्यावसायिक प्रवासी विमानांची ये-जा सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राने उद्यापासून विमानसेवेला काही प्रमाणात संमती दिली असली तरी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत मात्र ती सोमवारी सुरू होणार नाही. विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे मंगळवारपासून विमानसेवा सुरू होईल. पश्चिम बंगालने २८ मेपासून विमानसेवा सुरू करण्यास संमती दिली आहे.
प्रवासासाठी नवे नियम
नवी दिल्ली : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवे नियम जाहीर केले आहेत. विमानतळ, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था राज्यांना करावी लागेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यात कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास राज्ये स्वत:ची क्वारंटाईन किंवा आयसोलेशन व्यवस्था तयार करू शकतात.