हवामान बदल शेतीसाठी मोठे आव्हान - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:48 AM2021-09-29T05:48:31+5:302021-09-29T05:49:09+5:30
प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेत त्याला प्रतिसाद देणाऱ्या ३५ पीक जातींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले.
नवी दिल्ली : प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेत त्याला प्रतिसाद देणाऱ्या ३५ पीक जातींचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. हवामान बदल हा शेती आणि पर्यावरणासाठी मोठे आव्हान ठरला आहे, असे सांगून मोदी यांनी त्याच्याशी लढण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार उपलब्ध करण्यात आलेल्या पिकांच्या जाती विशेष गुणांच्या असून हवामानाशी जुळवून घेणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करतील.
पिकांच्या या जातींना भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) विकसित केले आहे, ते हवामान बदल आणि कुपोषणाचा प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने. या नव्या पीक जातींमध्ये हवामान बदलांशी जुळवून घेणारे तसेच उच्च पोषक घटक आहेत.
या नव्या जातींत लवकर पक्व होणारे सोयाबीन, रोगाला प्रतिकार करणाऱ्या तांदळाच्या जाती, गहू, मका मोती बाजरी (पर्ल मिलेट), हरभरा, राजगिरा, शिंगाडा, वालाच्या शेंगा आदींचा समावेश आहे.