महाराष्ट्रासह १४ राज्यांना हवामान बदलाचा धोका; आपत्तीग्रस्त १०० राज्यांच्या यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:09 PM2023-02-21T12:09:22+5:302023-02-21T12:09:39+5:30
देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो.
नवी दिल्ली : जगातील १०० राज्यांना हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांचा सर्वाधिक धोका आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या चौदा राज्यांचा समावेश आहे. त्या यादीत बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांचीही नावे आहेत.
यासंदर्भात 'ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क' या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलाचे सर्वाधिक तडाखे चीनमधील राज्यांना बसतात. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो. आपत्तींमुळे सर्वांत जास्त नुकसान होणाऱ्या १०० राज्यांपैकी अनेक राज्ये ही पाकिस्तान, ब्रिटन आदी देशांच्या आकाराएवढी आहेत. अमेरिकेतील राज्यांमध्येही नैसर्गिक संकटांमुळे तेथील नागरिकांना हाल सोसावे लागतात. ती राज्येही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
राज्यांतील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम
हवामान बदलामुळे येणाया नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देशांवर, त्यातील राज्यांवर आर्थिक अरिष्टही त्यामुळे या राज्यांतील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. २०५० सालपर्यंत या राज्यांमध्ये हवामान बदलामुळे नेमकी काय स्थिती असेल याचाही अभ्यास काही संस्था करत आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे बँका, उद्योगधंदे यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा वेध ऑस्ट्रेलियातील क्रॉस डिपेन्डन्सी इनिशिएटिव्हसारख्या संस्था घे आहेत.