नेजल लसीची लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:05 AM2021-09-10T06:05:20+5:302021-09-10T06:06:04+5:30

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले

Clinical trial of nasal vaccine will be held soon | नेजल लसीची लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल

नेजल लसीची लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल

Next
ठळक मुद्देशास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल लस नाकातील म्यूकस मँबरेनचे  संरक्षण करेल. यामुळे संपूर्ण पोट किंवा पोटावर विषाणूंपासून संरक्षणात्मक कवच तयार होते

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत देशासाठी आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेकच्या नेजल लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सुरू होणार आहेत. भारत बायोटेक कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी नियामक मान्यता गेल्या ऑगस्ट महिन्यात मिळाली होती. ही लस नाकाद्वारे दिली जाते. 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, या लसीची चाचणी येत्या एक-दोन आठवड्यांत सुरू होईल. या लसीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय असणार आहेत. चाचणी दरम्यान, स्वयंसेवकांना नेजल लसीचे दोन डोस ४ आठवड्यांच्या अंतराने दिले जातील. 
शास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल लस नाकातील म्यूकस मँबरेनचे  संरक्षण करेल. यामुळे संपूर्ण पोट किंवा पोटावर विषाणूंपासून संरक्षणात्मक कवच तयार होते. त्यामुळे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नाकाद्वारे होणारे संसर्ग टाळण्यासाठी कोविड-अनुरूप वर्तन फार महत्त्वाचे आहे.

Web Title: Clinical trial of nasal vaccine will be held soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.