नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांचे जवळचे संबंध
By Admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30
पृथ्वीराज चव्हाण : ललित मोदींचा ई-मेल उघड
प थ्वीराज चव्हाण : ललित मोदींचा ई-मेल उघडपुणे : नरेंद्र मोदी यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयपीएलचे तत्कालीन अध्यक्ष ललित मोदी यांनी त्यांच्या एका सहकार्याला ई-मेल पाठविला होता. त्यामध्ये मोदी यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, आपल्याला पाहिजे ते करतील असा उल्लेख ललित मोदी यांनी केला आहे. तो ई-मेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केला.परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ललित मोदी यांना भारतातून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचेही ललित मोदींशी जवळचे संबंध असून त्यांच्या सांगण्यावरूनच सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना मदत केल्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे व शिवराजसिंह चौहान यांची सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत या तिघांनी राजीनामे देणे आवश्यक आहे. ते राजीनामे देत नाहीत तोपर्यंत काँगे्रसकडून आणखी तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांची १५ सप्टेंबर रोजी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्याच्या दुसर्या दिवशी ललित मोदी यांनी शंतनुचारी यांना एक ई-मेल पाठविला. त्यामध्ये ललित मोदी यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी माझे जवळचे संबंध असून ते आपल्याला पाहिजे ते करतील असे नमूद केले आहे. त्यानंतर बीसीसीआयकडून गुजरात क्रिकेट असोसिएशनला २२ कोटी रूपये दिले गेले.'भूमि अधिग्रहण कायद्यामध्ये केंद्रातील भाजप सरकारने अध्यादेश काढून बदल केला आहे. त्यामुळे उद्योगपती व बिल्डरांना फायदा होणार आहे. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे तो आता रद्द झालेला आहे. ...तर जीएसटी मंजूर होईलदेशभरात एकच करप्रणाली लागू व्हावी याकरिता यूपीए सरकारनेच जीएसटी विधेयक तयार केले, त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्या बदलांविषयी काँग्रेसला काहीही माहिती दिली नाही. भाजपने जीएसटी कायद्याबाबत काँग्रेसला विश्वासात घेतल्यास जीएसटी कायदा मंजूर व्हायला अडचण येणार नाही. विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा मंजूर करता येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. ---