...अन् 40 तरुण IAS अधिकारी थोडक्याच बचावले; आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 04:08 PM2018-05-21T16:08:32+5:302018-05-21T17:24:40+5:30
मध्य प्रदेशातील ग्वालियारमधील घटना
भोपाळ: मध्य प्रदेशच्या ग्लालियारमध्ये आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातातून 40 उपजिल्हाधिकारी थोडक्यात बचावले आहेत. गाडीतील प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बिर्लानगर रेल्वेस्थानकाजवळ हा प्रकार घडला.
विशाखापट्टणम-निझामुद्दीन 22416 आंध्र प्रदेश एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या चार डब्यांना दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या चार डब्यांमधील 130 प्रवाशांना योग्य वेळी खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. यामध्ये 40 उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. हे सर्व अधिकारी त्यांचं प्रशिक्षण संपवून परतत होते. शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हाय टेन्शन वायर ट्रेनवर कोसळल्यानं B6 आणि B7 बोगींना आग लावली. यानंतर ही आग आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचली.