सूनबाई सासुला म्हणाली मी तुझ्या मुलाची हत्या केली; चार दिवसांनंतर खोलीतून किडे बाहेर आले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:51 PM2021-08-29T12:51:47+5:302021-08-29T12:53:58+5:30
राजस्थानमधील डूंगरपुर जिल्ह्यातील साबला पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
राजस्थान: राजस्थानमधील डूंगरपुर जिल्ह्यातील साबला पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेत पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी महिला फरार असून सध्या तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मृत तरुणाच्या आईने सुनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले. पत्नी कांता 23 ऑगस्ट रोजी खोली बंद करीत असल्याचं दिसत आहे. यानंतर ही खोली पुन्हा उघडली गेली नाही. मृत तरुणाची आई बेवा गलाब यादव (65) यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा नाथू यादवने 6 महिन्यापूर्वी कांतासोबत (विधवा विवाह) लग्न केलं होतं.
अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी
लग्नानंतर दोघे मुगेड गावात खोली भाड्याने घेऊन राहत होते. दोघेही मजुरी करून घर चालवत होते. मृत तरुणाच्या आईने सांगितलं की, 23 ऑगस्ट रोजी नाथूची पत्नी त्यांच्या घरी आली होती. तिने सांगितलं की, मी तुझ्या मुलाची हत्या केली आहे. आता मी तुमच्या घरात राहणार. मुंगेडमध्ये त्याच्या घरावर टाळं लावलं होतं.
तरुणाने पत्नीला ५० वर्षीय पुरुषासोबत फिरताना रंगेहाथ पकडलं; दोघांनी मिळून त्यालाच मारलं!
नाथू यादव तिच्या पत्नीसोबत राहत होता, त्या खोलीतून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागली. खोलीतून किडे निघत होते. जवळपासच्या लोकांनी खिडकीतून पाहिलं तर आत मृतदेह पडला होता. यानंतर लोकांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दार उघडून पाहिलं तर घरात नाथूचा मृतदेह पडला होता आणि त्याला किडे लागले होते. मृतदेह चार दिवसांपासून येथे पडून होता, त्यामुळे शरीर काळं पडलं होतं आणि दुर्गंधी येत होती. घटनेची माहिती मिळताच नाथूची आई घटनास्थळी दाखल झाली. मुलाचा मृतदेह पाहताच आईच्या पायाखालून जमिन सरकली.
१६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने केली छेडछाड; घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी घेतली https://t.co/4PVyb0xsEv
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021