शिक्षकाच्या बंद घरात भरदिवसा चोरी सुयोग कॉलनीत घटना दागिने लांबविले, मात्र हजाराची नोट व मोबाईल सुरक्षित
By admin | Published: January 7, 2016 09:37 PM2016-01-07T21:37:37+5:302016-01-07T21:37:37+5:30
जळगाव: गिरणा टाकी परिसरातील सुयोग कॉलनीत राहणार्या सुधाकर सोनवणे यांच्या आकांक्षा अपार्टमेंटमधील बंद घरातून पाच ग्रॅमची अंगठी व मंगळसूत्र असा २२ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. सोनवणे हे नुतन मराठा महाविद्यालयात शिक्षक आहेत. गुरुवारी सकाळी ते महाविद्यालयात गेले होते तर मुलेही शाळेत गेली होती. दुपारी घरी दोन वाजता घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सोनवणे हे घर बंद केल्यानंतर त्याची चाबी बाहेरच चप्पल व बुट ठेवण्याच्या स्टॅँडमध्ये ठेवत असत. चोरट्यांनी तेथून चाबी काढून चोरी केल्यानंतर पुन्हा कुलूप लावून चाबी त्याच जागेवर ठेवली होती. चोरट्यांनी तीनही बेडरुमध्ये पाहणी केली मात्र कपाटात ठेवलेली दागिनेच काढून घेतले. एक हजार रुपयाची नोट व मोबाईलला मात्र त्यांनी हातही लावला नाही.
Next
ज गाव: गिरणा टाकी परिसरातील सुयोग कॉलनीत राहणार्या सुधाकर सोनवणे यांच्या आकांक्षा अपार्टमेंटमधील बंद घरातून पाच ग्रॅमची अंगठी व मंगळसूत्र असा २२ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. सोनवणे हे नुतन मराठा महाविद्यालयात शिक्षक आहेत. गुरुवारी सकाळी ते महाविद्यालयात गेले होते तर मुलेही शाळेत गेली होती. दुपारी घरी दोन वाजता घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सोनवणे हे घर बंद केल्यानंतर त्याची चाबी बाहेरच चप्पल व बुट ठेवण्याच्या स्टॅँडमध्ये ठेवत असत. चोरट्यांनी तेथून चाबी काढून चोरी केल्यानंतर पुन्हा कुलूप लावून चाबी त्याच जागेवर ठेवली होती. चोरट्यांनी तीनही बेडरुमध्ये पाहणी केली मात्र कपाटात ठेवलेली दागिनेच काढून घेतले. एक हजार रुपयाची नोट व मोबाईलला मात्र त्यांनी हातही लावला नाही.हा प्रकार लक्षात आल्यानंतर सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. मात्र त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला.त्यामुळे गुन्हा दाखल होवू शकला नाही असे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी सांगितले. चौकशीसाठी इमारतीतील सुरक्षा रक्षकाला बोलावण्यात आले होते, परंतु त्याच्याकडूनही समाधानकारक माहिती मिळू शकली नाही,त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.