गंडा घालणार्या महिलांना पुन्हा कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 12:02 AM2016-06-30T00:02:23+5:302016-06-30T00:02:23+5:30
जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील १३ महिलांना २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात गंडा घालणार्या नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन्ही महिलांना न्यायालयाने बुधवारी पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
Next
ज गाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील १३ महिलांना २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात गंडा घालणार्या नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन्ही महिलांना न्यायालयाने बुधवारी पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.जाधव व साळुंखे यांनी गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १३ महिलांना गंडा घातल्या प्रकरणी त्यांच्याविरुध्द रविवारी तालुका पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी त्यांना न्या. एस.जे.शिंदे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासात त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.श्रीकांत भुसारी काम पाहत आहेत.जामीन अर्ज फेटाळलाजळगाव: रस्त्यावर थांबून बोलत असताना वकीलाचा मोबाईल लांबविणार्या गोपाळ कोळी याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावला. नुतन मराठा महाविद्यालयाजवळ रात्री साडे दहा वाजता ॲड.आनंद मुजूमदार यांचा मोबाईल कोळीने लांबवला होता. शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. न्या.एस.के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके यांनी काम पाहिले.