किरण बेदींच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट

By admin | Published: November 13, 2014 02:06 AM2014-11-13T02:06:17+5:302014-11-13T02:06:17+5:30

माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याविरुद्धच्या एका फसवणूकप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आह़े

Closure Report in Kiran Bedi's Case | किरण बेदींच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट

किरण बेदींच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट

Next
नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याविरुद्धच्या एका फसवणूकप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आह़े दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर किरण बेदी भाजपात सामील होण्याच्या चर्चेला यामुळे आणखी बळ मिळाले आह़े 
डिसेंबर 2क्13 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या एका गटाने बेदींना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनविले जाण्याची मागणी केली होती़ एकेकाळी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी राहिलेल्या बेदी आता नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत़ मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला त्यांनी जोरदार पाठिंबा दिला आह़े
28 ऑक्टोबरला दिल्ली पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आह़े आम्ही मायक्रोसॉफ्टच्या अधिका:यांचे जबाब घेतल़े मात्र, त्यांनी बेदींकडून निधीचा गैरवापर झाल्याचे आरोप नाकारले आहेत़ पोलिसांनी पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या लेखा अहवालाची प्रतही सादर केली आह़े यात सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक असल्याचे म्हटले आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन गाजत असतानाच, नोव्हेंबर 2क्11 मध्ये किरण बेदी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे प्रकरण दाखल करण्यात  आले होत़े मायक्रोसॉफ्टने बेदींच्या ‘इंडिया व्हिजन फाऊंडेशन’ आणि ‘नवज्योती फाऊंडेशन’ या ट्रस्टला देणगी दिली होती़ 
 
4या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता़ पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य असताना बेदींनी 2क् हजार रुपये किंमत असलेले दोन संगणक प्रत्येकी 5क् हजार रुपये देऊन खरेदी केल्याचाही आरोप होता़ याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होत़े

 

Web Title: Closure Report in Kiran Bedi's Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.