दिवसभर ढगाळ वातावरण; पावसाचा मात्र शिडकावा
By Admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:21+5:302015-07-22T00:34:21+5:30
सोलापूर :
स लापूर : गेल्या काही दिवसांपासून ऊन, वारा आणि ढगाळ वातावरण असे चित्र पाहायला मिळत आहे. आजही शहरात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हमखास पाऊस पडेल, अशी आशा असताना सायंकाळी शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरीशिवाय काही घडले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्?ातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दररोज दिवस उजाडताच उन्हाच्या झळा जाणवायच्या.आज सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते. दिवसभर अशीच स्थिती होती. वातावरणातील बदलामुळे आज पाऊस येण्याची चिन्हे व्यक्त होत होती. दुपारी चारच्या सुमारास शहर आणि हद्दवाढ परिसरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.मृग नक्षत्रात सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाल्याने जिल्?ातील शेतकर्यांमध्येही चैतन्याचे वातावरण पसरले होते. अनेकांनी खरिपाच्या पेरण्याही केल्या, मात्र शेतकर्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण होते पाऊस मात्र पडत नाही. उन्हाळ्याप्रमाणे तापमानात वाढ होतेय. सरासरी 32 ते 34 अं.से. तापमानाची नोंद हवामान खात्याकडे नोंदली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे नुसतेच पावसाळी वातावरण दिसून आले.