चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:46 PM2020-05-16T15:46:33+5:302020-05-16T16:00:32+5:30
जागतिक कंपन्यांची उत्पादनासाठी पहिली पसंती ही नेहमीच चीनला असते. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे चीनमधील जवळपास अनेक कंपन्या या भारतात येण्याच्या विचारात आहेत.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. मोठमोठ्या कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला असून आर्थिक नुकसान झालं आहे. जागतिक कंपन्यांची उत्पादनासाठी पहिली पसंती ही नेहमीच चीनला असते. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे चीनमधील जवळपास अनेक कंपन्या या भारतात येण्याच्या विचारात आहेत. या कंपन्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. देशातील 9 राज्यांमध्ये कंपन्यांना आकर्षित करतील असे 10 मेगा क्लस्टर निश्चित करण्यात आले आहेत.
नोएडा, ग्रेटर नोएडा क्लस्टर हे इलेक्ट्रॉनिक हब आहे, हैदराबाद हे लस आणि औषध निर्यातीचं सर्वात मोठं केंद्र आहे. अहमदाबाद, बडोदा (भरुच-अंकलेश्वर क्लस्टर), मुंबई-औरंगाबाद, पुणे, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई आणि तिरुपती-नेल्लोर हे गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे क्लस्टर्स आहेत. पुणे-औरंगाबाद ऑटो आणि ऑटो कंपोनेंटचं हब आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या 10 मेगा क्लस्टरमध्ये 100 प्रसिद्ध औद्योगिक पार्क आणि देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय अशा 600 पेक्षा जास्त कंपन्या आहेत.
पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारीhttps://t.co/EhXa2g8q7Q#Pakistan
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
CoronaVirus चीनला मोठा झटका! कायमचा बायबाय करत 'ही' जुनी कंपनी येतेय भारतात
वाणिज्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय गुंतवणूक प्रसार आणि सुलभता संस्था काम करत आहे. याशिवाय या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या मदतीनेही दिशादर्शक कार्यक्रम आखला जात आहे. गुंतवणूकदार भारतात किती कमी वेळेत गुंतवणूक करू शकतात आणि कामकाज करू शकतात, याबाबतची माहिती दिली जात आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठीया संस्थेकडून प्रामुख्याने तीन फायदे सांगितले जात आहेत. नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट करातील कपात, काही निर्मिती कंपन्यांसाठी जागतिक इन हाऊस केंद्र आणि मोठी देशांतर्गत बाजारपेठ हे फायदे सांगितले दिले जात आहेत.
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णयhttps://t.co/Qc9d4ts2zm#PrithvirajChavan#Temples#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशाराhttps://t.co/lJnCiA31Ow#CoronaUpdatesInIndia#mobile#technology
— Lokmat (@MiLOKMAT) May 16, 2020
महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी
धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा
'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल
कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता