केळीचा शालेय पोषण आहारात समावेश मुख्यमंत्र्यांची घोषणा : शाश्वत सिंचनासाठी जैन इरिगेशनने आराखडा तयार करावा
By admin | Published: January 9, 2016 11:23 PM2016-01-09T23:23:42+5:302016-01-09T23:23:42+5:30
(मुख्य १ व सेंट्रल डेस्कसाठी)
Next
(म ुख्य १ व सेंट्रल डेस्कसाठी)फोटो- १०अप्पासाहेब पवार पुरस्कार- कॅप्शन: विजय व जयश्री इंगळे दाम्पत्यास पुरस्कार देताना देवेंद्र फडणवीस. सोबत डावीकडून रक्षा खडसे, ना.धों.महानोर, शरद पवार, भवरलाल जैन, हरिभाऊ जावळे, गिरीश महाजन.जळगाव : केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन हिल्स येथे शनिवारी दुपारी आयोजित पद्मश्री डॉ.अप्पासाहेब पवार आधुनिक कृषि उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषि मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते. शाश्वत सिंचनासाठी जैन इरिगेशनने राज्याचा आराखडा तयार करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांच्या हस्ते चितलवाडी, ता.तेल्हारा, जि.अकोला येथील विजय आत्माराम इंगळे पाटील यांना या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, पुरस्कार प्राप्त विजय इंगळे पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री, खासदार रक्षा खडसे, कविवर्य ना.धों. महानोर आदी मान्यवर उपस्थित होते. युती शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळेच यंदा शाश्वत सिंचन देता आल्याचे सांगत कृषितंत्रात बदल करणार नाही, तोपर्यंत परिवर्तन करता येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ---- इन्फो---शेतकर्यांनी रोखल्यावर घोषणामुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केळीचा उल्लेख न केल्याने उपस्थित शेतकर्यांमध्ये चुळबुळ सुरू होती. मुख्यमंत्री भाषण संपवून आपल्या आसनाकडे जात असतानाच उपस्थित शेतकर्यांनी केळीच्या विषयाचे काय? असा सवाल करीत गोंधळ केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परत माईकचा ताबा घेत अंगणवाडीच्या पोषण आहारात केळीच्या समावेशाचा निर्णय झाला असल्याची घोषणा केली.---- इन्फो---शाश्वत सिंचनासाठी आराखड्याची जबाबदारीमुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले की, अनिल व अजित जैन यांच्याशी बोललो. शाश्वत सिंचनासाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी जैन इरिगेशनने बृहतआराखडा तयार करावा, असे त्यांना सुचविले असल्याचे सांगितले. जैन इरिगेशनने अनेक प्रयोग केले आहेत. दक्षिणेतून आंबा आणून प्रक्रिया केली जात असल्याचे पाहून आर्य वाटले. कोकणातील आंब्यावर प्रक्रिया करावी, असे आवाहन त्यांना केले. त्यावर कोकणातही जागा घेतली असून तेथे हापूसवर प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असल्याचे समजल्याने समाधान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.