२०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:59 PM2022-04-07T22:59:22+5:302022-04-07T23:01:25+5:30

आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे : अरविंद केंजरीवाल

cm arvind kejriwal speaks on gujarat and himachal election said how aap won in punjab will compete pmnarendra modi | २०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले...

२०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले...

Next

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) विजयाचे रहस्य उघड केले. कट्टर प्रामाणिकपणा, कट्टर देशभक्ती आणि मानवता हे आपल्या पक्षाच्या विजयाचे मुख्य मंत्र असल्याचे केजरीवाल म्हणाले. गेल्या ७५ वर्षांच्या राजकीय संस्कृतीने त्रस्त झालेल्या लोकांनी आपोहूनच 'आप'ला निवडल्याचं त्यांनी सांगितलं.

"पाच वर्ष तुम्ही लुटा, पाच वर्ष आम्ही लुटतो या कल्चरमुळे पंजाबमधील लोक त्रस्त होते. ७५ वर्षांच्या राजकीय संस्कृतीनं त्रस्त असलेल्या लोकांनीच आपला विजय मिळवून दिला आहे. दिल्लीतील सात वर्षांच्या शासनकाळात लोकांना आप ही किती निराळा पक्ष आहे हे समजलं आहे," असंही केजरीवाल म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "पंजाबमध्ये आम्ही लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरलो आहोत. तिकडे आमच्या विजयाची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्या ठिकाणचे लोक राजकीय पक्षांपासून नाराज होते आणि दुसरं म्हणजे ते दिल्लीत काम करण्याच्या मॉडेलपासून प्रभावीत होते," असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही प्रामाणिक
"आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे," असं केजरीवाल म्हणाले. आम्ही दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं आहे. अन्य राज्यांवरही आपलं लक्ष केंद्रित असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावरही भाष्य केलं. "काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीसाठी भाजप जबाबदार आहे. जेव्हा काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणात नरसंहार झाला, तेव्हा भाजपच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार होतं. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांचा सामना करणार का?
जसा २०१४ मध्ये केला होता तसा २०२४ च्या निवडणुकीत केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. "तो काळ वेगळा होता. २०२४ मध्ये आम्ही मोदींशी सामना करण्यास उत्सुक आहोत," असंही ते म्हणाले.

Web Title: cm arvind kejriwal speaks on gujarat and himachal election said how aap won in punjab will compete pmnarendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.