CM केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली; नेमंक कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 10:50 PM2024-08-18T22:50:09+5:302024-08-18T23:01:02+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पुण्यात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह हेही उपस्थित होते. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अर्धा तास चाललेल्या या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. या बैठकीमुळे आम आदमी पक्ष महाविकास आघाडीत सामील झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
"उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गुवाहाटीला गेलो"; एकनाथ शिेंदेंचा मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्रात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत आप पक्षालाही महाआघाडीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. सध्या विरोधी महाविकास आघाडी पक्षात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.
यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ८, काँग्रेसला १३ आणि शिवसेना (उद्धव गट) ९ जागा जिंकल्या होत्या. यामुळे आता महाविकास आघाडीने विधानसभेची जोरदार तयारी केली. यामुळे आता आम आदमी पक्षही विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या महिन्यात आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी स्थापन झाल्याचे ते म्हणाले होते. विधानसभा निवडणुका हा वेगळा विषय आहे. यामध्ये स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार आहे. पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांना सांगितले होते.