केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:16 IST2025-01-12T16:13:26+5:302025-01-12T16:16:25+5:30
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे.

केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकांकडे मदतीचे आवाहन केले होते. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला क्राउड फंडिंगची आवश्यकता असून एकूण ४० लाख रुपये हवे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या चार तासांतच त्यांना १०,३२,००० रुपयांची देणगी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलं होतं असं आवाहन -
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या होत्या की, निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला 40 लाख रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी आपण आम्हाला 100 ते 1000 रुपयांपर्यंतची मदत करू शकतात. यामुळे निवडणूक लढण्यास मदद होईल.
'देशभरातून लोकांनी आपल्याला मदत केली' -
जनतेला आवाहन करताना आतिशी म्हणाल्या होत्या, "यापूर्वीही दिल्लीच्या जनतेने आपला समर्थन दिले आहे. लोकांच्या छोट्या छोट्या सहकार्याने आम्हाला निवडणूक लढवण्यास आणि जिंकण्यास मदत झाली आहे. दिल्लीतील सर्वात गरीब लोकांनी आम्हाला १० ते १०० रुपयांपर्यंत, अशा छोट्या देणगीच्या सहाय्याने समर्थन दिले आहे." याशिवाय, दिल्लीच नव्हे तर, देशभरातून लोकांनी आपल्याला मदत केली आहे, असेही आतिशी यांनी म्हटले होते.