CM भगवंत मान लवकरच PM मोदी- HM शहांच्या भेटीला, पंजाब पे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:40 PM2022-03-22T17:40:01+5:302022-03-22T17:55:34+5:30
मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचं ट्विटरवरुन सांगितलं
नवी दिल्ली - सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये 'आप'च्या जबरदस्त विजयानंतर भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून मान यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. तर, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचं ट्विटरवरुन सांगितलं. मुख्यमंत्री मान हे गुरुवार 24 मार्च रोजी दिल्ली दौऱ्यावर जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेटणार आहेत. या भेटीत पंजाबमधील समस्या आणि काही विषयांसंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचेही मान यांनी म्हटले आहे.
पंजाब के मुख्यमंत्री का पद सँभालने के बाद मैंने शिष्टाचार भेंट के लिए एवं पंजाब के मुद्दों पर बात करने के लिए माननीय प्रधानमंत्री जी और गृह मंत्री जी से समय माँगा है।
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 22, 2022
मोदींनी केले होते अभिनंदन
भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मान यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. "पंजाबच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमधून भगवंत मान यांना दिले आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शहीद भगत सिंग यांच्या खटकरकलान या गावी भगवंत मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मान यांनी यावेळी पंजाबी भाषेत शपथ घेतली.