Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 05:32 PM2021-06-06T17:32:09+5:302021-06-06T17:36:22+5:30
Karnataka Politics: कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विरोध केला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
बेंगळुरू: कर्नाटक भाजपमधील अंतर्गत वाद अद्यापही शमलेला दिसत नाही. कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विरोध केला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांबाबत बीएस येडियुरप्पा यांना विचारले असता, त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असून, पक्षनेतृत्व सांगेल, तेव्हाच राजीनामा देईन, असे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. (cm BS Yediyurappa says i will resign the day party high command asks me to quit)
मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा समर्थकांनी दिल्याचे सांगितले जात आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबतची कोणतीच चर्चा नाही. त्यांनी फक्त वक्तव्य केले की, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. कारण ते पक्षाचा आदेश मानणारे नेते आहेत, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम नारायण यांनी म्हटले आहे.
I don't feel there is no alternate leadership in BJP here. I will resign the day party high command asks me to quit: Karnataka Chief Minister BS Yediyurappa pic.twitter.com/ZzhxWiK7Tg
— ANI (@ANI) June 6, 2021
“संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला
कर्नाटक भाजपमध्ये दुसरा पर्याय नाही
मला पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तात्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं कर्नाटक भाजपात दुसरा पर्याय नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर राहणार. ज्या दिवशी सांगतील राजीनामा दे, त्या दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन, असे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
“योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही”
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्येही येडियुरप्पा यांच्या उचलबांगडीची मागणी होत आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्यांकडूनही येडियुरप्पा यांना हटविण्याचाी मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार बसगौंडा पाटील यत्नान यांनी, राज्यात भाजपला वाचविण्यासाठी आगामी निवडणुकांपूर्वीच बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्यात यावे, असे त्यांनी म्हटले होते. भाजप हायकमांड तीन राज्यांत मुख्यमंत्रीपदाचे चेहरे बदलणार आहे. उत्तराखंड येथील मुख्यमंत्री बदलण्यात आला असून, आता कर्नाटक आणि हरियाणाची बारी असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून या बदलासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.